सहकारमंत्री सुभाष देशमुख तोंडघशी शेतकऱ्याच्या खात्यावर ९ तारखेलाच पॆसे जमा 


बीड (रिपोर्टर):- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुष्काळग्रस्तांच्या मेळाव्यात व्यासपीठावरून सरकारच्या कर्जमाफीचा भांडाफोड केल्यानंतर बाळासाहेब सोळंके या शेतकर्‍याच्या खात्यावर पाच तासामध्ये रक्कम जमा झाली. यावर खुलासा करताना सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले होते बाळासाहेब सोळंके यांचे कर्ज सरकारने २०१८ सालीच स्टेट बँकेकडे पैसे जमा केले. मात्र आज शिवसेनेने सुभाष देशमुख यांच्या वक्तव्याचाही पर्दाफाश केला. कर्जमाफीची ही रक्कम गतवर्षी नव्हे तर ९ जानेवारीला जमा झाल्याचे स्पष्ट झाले.
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना सरकारने कर्जमाफीचा घोषणा केली. मात्र ती कशी फसवी आहे याचा अनुभव राज्यातील शेतकरी घेत असताना काल बीडमधील दुष्काळी मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुखांनी व्यासपीठावरूनच कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळालेल्या शेतकर्‍याच्या डोक्यावर कर्जाचे ओझे शिल्लक राहिले. मग कर्जमाफी फसवी आहे की नाही ते दाखवून दिले. या घटनेनंतर अवघ्या पाच तासात बाळासाहेब सोळंके या शेतकर्‍याच्या खात्यावर रक्कम जमा झाली आणि कर्जखाते बंद करण्यात आले. कर्जमाफीचा खरा लाभ झालेला हा शेतकरी काल खर्‍या अर्थाने कर्जमुक्त झाला. मात्र सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी या शेतकर्‍याची कर्जमाफी यापूर्वीच झाली आहे त्याला प्रमाणपत्र देण्यात आले आहे आणि गतवर्षीच त्याच्या खात्यावर सरकारने रक्कम जमा केली असा खुलासा केला होता. गुरुवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी बाळासाहेब सोळंके यांची धारूरमध्ये भेट घेतली. तेथून स्टेट बँकेतील व्यवस्थापकांची भेट घेऊन त्या खात्यावरील पुरावा पैसे जमा झालेल्याची तारीख आणि आजचं स्टेटमेंट ताब्यात घेतले. तेव्हा असे स्पष्ट झाले संबंधित शेतकर्‍याच्या खात्यावर ९ जानेवारीला सायंकाळी कर्जाची ही रक्कम झाली. यावरून सरकार आणि सरकारमधील मंत्री शेतकर्‍यांची कशी दिशाभूल करीत आहे हे स्पष्ट झाले.
या शिवसैनिकाची मेहनत कामाला आली
दुष्काळी बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पशुखाद्य वाटप करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख बीडमध्ये येणार असल्याने शिवसेनेचे पदाधिकारी जिल्हाभरात बैठका घेत होते. त्यात जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा समन्वयक संजय महाद्वार, धारूरमध्ये शेतकर्‍यांची बैठकीसाठी गेले असता बाळासाहेब सोळंके यांनी आपली व्यथा संजय महाद्वार यांच्याजवळ व्यक्त केली. या घटनेचे गांभीर्य महाद्वार यांच्या लक्षात आले आणि त्यांनी थेट जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांना माहीती दिली तात्काळ सचिन मुळूक यांनी या गेाष्टीच गांभीर्य ओळखुन मा. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या निदर्शनास आणून दिले. कोणतीही टाळाटाळ न करता सचिन मुळूक यांनी दाखवलेली तत्परता त्या शेतकर्‍याला न्याय देऊन गेली.
 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review