अंतरवणपिंप्रीतील शेतकर्‍यांवर भरदुष्काळात संक्रांत; आज पुन्हा पाच जनावरे दगावली; आ.मेटेंची गावाला भेट,

eReporter Web Team

भ्रमणध्वनीवरून पशुसंवर्धन मंत्र्याशी चर्चा; शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी 
बीड (रिपोर्टर):- अंतरवणपिंप्रीसह परिसरात गेल्या काही दिवसापासून जनावरे दगावत आहे. घटसर्प, लाळ्या खुरकुताची लस उपलब्ध का करून दिली जात नाही या कारणावरून काल शिवसंग्रामने पशु वैद्यकीय अधिकार्‍यास चांगलेच धारेवर धरले होते. आज पुन्हा पाच जनावरे दगावल्याने संबंधीत शेतकर्‍याचे दुष्काळात मोठे आर्थिक नुकसान झाले. आज सकाळी आ.विनायक मेटे यांनी गावात भेट देवून जनावरे दगावण्याबाबतची माहिती पशुवैद्यकीय मंत्री महादेव जानकर यांच्याशी संपर्क साधुन तात्काळ लस उपलब्ध करून देण्याची व संबंधीतांना आर्थिक मदत करून देण्याची मागणी केली. 
बीडपासुन काही अंतरावर असलेल्या अंतरवणपिंप्री येथे जनावरे दगावत आहे. काल नवनाथ प्रभाळे, सचिन कोटुळेसह आदी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.पालवे यांना धारेवर धरले. पालवे यांनी शिवसंग्रामच्या बारा कार्यकर्त्यावर धक्काबुक्की केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला. आज सकाळी ही पाच जनावरे दगावली आहे. त्यामध्ये रमेश प्रभाळे यांची एक गाय, रामकिसन वाघमारे यांची एक शेळी, कोंडीराम शिंदे यांची शेळी, लक्ष्मण शिंदे यांची म्हैस आणि संतोष शिंदे यांची शेळी मरण पावली. दुष्काळामध्ये शेतकर्‍यांचे पशुधन घटसर्प आणि लाळ्याखुरकुताने दगावत असल्याने शेतकर्‍याला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. आज सकाळी आ.विनायक मेटे यांनी गावात जावून शेतकर्‍यांची चर्चा केली. लस का उपलब्ध करून दिली जात नाही? शेतकर्‍यांच्या जनावरावर उपचार करण्यास टाळाटाळ का केली जाते? याबाबतचा जाब मेटे यांनी पशु वैद्यकीय मंत्री महादेव जानकर यांना विचारत लस उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच ज्या शेतकर्‍याचे पशुधन दगावले आहेे त्या शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्याची मागणीही मेटे यांनी केली. 
नेमका आजार कोणता?
जनावरे दगावत असल्याने अंथरवणपिंप्रीसह इतर शेतकरी चांगल्याच संकटात सापडले आहे. आत्तापर्यंत जवळपास ६० जनावरे दगावल्याने कुठल्या आजार जनावरांना जडला हे अद्याप निष्पन्न झालेले नाही. लाळ्या खुरकुत, घटसर्प कि तापेमुळे जनावरे दगावल आहेत. हे अजूनही पशु वैद्यकीय विभागाला उमजलेले नाही.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like