सुमोची दुचाकीला धडक; एक गंभीर

सुमोची दुचाकीला धडक; एक गंभीर
बीड (रिपोर्टर):- गेवराई तालुक्यातील माजलगाव-गढी रस्त्यावर माऊली फाटा येथे सुमोने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. 
    माजलगाव-गढी रस्त्यावरील माऊली फाटा येथे सुमो (क्र. एम.एच. ४४ जी. २५७९) ने दुचाकीला (क्र. एम.एच. २१ -०९१३) धडक दिल्याने यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. अपघात घडल्यानंतर उपस्थित नागरिकांनी १०८ रुग्णवाहिकेला कॉल करून जखमीला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review