राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी धरणे

eReporter Web Team

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी धरणे
बीड (रिपोर्टर):- संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे सर्व कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हाभरातील विविध चर्मकार बांधव यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
गेली अनेक दिवसापासून चर्मकार महासंघाच्या विविध मागण्या प्रशासनासमोर मांडलेल्या आहेत. मात्र त्यातून प्रशासनाने कोणतीही तत्परता न दाखवता त्यांच्या निर्णय प्रलंबित ठेवलेले आहेत. अशा या विविध मागण्या प्रशासनाने त्वरीत मान्य कराव्यात यासाठी आज महाराष्ट्रभर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे. त्यामुळे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चर्मकार महासंघाने आज सकाळी १० वाजता एकत्र येवून विविध घोषणा देत प्रशासनाकडे विविध मागण्या मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. संत रोहिदास चर्मद्योग व महामंडळाचे सर्व कर्ज माफ करण्यात यावे. तसेच महामंडळाचे प्रलंबित कर्ज त्वरित मंजूर करण्यात यावे. चर्मकार आयोगाची तात्काल अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच रोहिदास जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी,गोंदी या ठिकाणी झालेल्या चिमुकलीवर बलात्काराची उत्तर चौकशी करून आरोपींना कडक शासन करण्यात यावे, तसेच अन्यायग्रस्त कुटुंबियांचे पुनर्वसन करावे अशा या विविध मागण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने रोहिदास बनसोडे, रविंद्र बनसोडे, नारायण चांदबोधले, विलास बामणे, नानासाहेब घोडके, शिवाजी कांबळे, पुरूषोत्तम भोसले, राजेश जाधव, चंद्रकला सोनवणे, आनंद कांबळे, राजु उणवणे तसेच अनेक चर्मकार बांधव यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 


अधिक माहिती: beed

Related Posts you may like