शेतकरी टिकला तरच देश टिकेल -चंद्रकांत खैरे

शेतकरी टिकला तरच देश टिकेल -चंद्रकांत खैरेगेवराईत पीक विमा मदत केंद्राचे लोकार्पण 
गेवराई (रिपोर्टर):- शिवसेना आजपर्यंत सर्वसामान्य आणि शेतकर्‍यांच्या हितासाठी संघर्ष करत आलेले आहे. यापूर्वीच्या दुष्काळात शेतकर्‍यांना चारा वाटप करण्यात आला. आजही शिवसेना शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकरी टिकला तरच देश टिकेल असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी केले. ते गेवराई येथील आयोजित बैठकीत बोलत होते. 
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकर्‍यांचा विषय ऐरणीवर घेऊन शिवसैनिकांना शेतकर्‍यांचे काम करण्याचे थेट आदेश दिले आहेत. या अनुषंगाने माजी खा. चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव  हे बीड जिल्हा दौर्‍यावर आले आहेत. जिल्ह्यातील गेवराई, बीड, माजलगाव, केज, अंबाजोगाई तालुक्यात ते शेतकर्‍यांशी संवाद साधत आहेत. पीक विमा मदत केंद्राची सुरुवात करणार आहेत. आज सकाळी गेवराई येथील शेतकरी पीक विमा मदत केंद्राचे लोकार्पण करून शेतकर्‍यांचे पीक विमा अर्ज भरून घेण्यात आले. या वेळी सभापती युद्धजित पंडित, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब अंबुरे, शेख एजाज, बबलू खराडे, तालुकाप्रमुख कालिदास नवले, दिनकर शिंदे, शहरप्रमुख शिनुभाऊ बेदरे, साहील देशमुख यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review