वाळूचा हप्ता घेणारा पेठ बीडचा ‘तो’ पोलिस कोण?

वाळूचा हप्ता घेणारा पेठ बीडचा ‘तो’ पोलिस कोण?

‘त्या’ हप्तेखोर पोलिसावर कारवाईची मागणी

बीड (रिपोर्टर) :-  पेठ बीड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वाळूचे टिप्पर आणायचे असेल किंवा हद्दीतून पुढे न्यायचे असेल तर पेठ बीड पोलिसांना प्रत्येकी टिप्पर ८ हजार रुपये हप्ता द्यावाच लागतो. एखाद्या टिप्परने हप्ता देण्यास थोडाही विलंब केला तर त्याला महसूल प्रशासनाच्या माध्यमातून तत्काळ खटला दिला जातो. आठ हजार रुपये हाप्ता घेवून स्वत:च्या घश्यात घालत पेठ बीड पोलिसांना बदनाम करणारा तो हाप्तेखोर पोलिस कर्मचारी कोण? त्याचा बंदोबस्त करुन त्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
    शासनाचा गडगंज पगार घेवूनही वाळूचा मलीदा लाटण्यासाठी पेठ बीड पोलिस ठाण्यातील तो हाप्तेखोर पोलिस कर्मचारी आपले कर्तव्य मोठ्या इमानदारीने पार पाढत प्रत्येक टिप्पर मालकाकडून न चुकता आठ हजार रुपयाचा हप्ता घेत आहे. हा हाप्तेखोर पोलिस आलेल्या प्रत्येक ठाणेप्रमुकापुढे मी प्रामाणीक असल्याचा आव आणत आहे. या हाप्तेखोर पोलिसांमुळे बेठ बीड पोलिस ठाणे बदनाम होत आहे. त्यामुळे या हाप्तेखोर पोलिस कर्मचार्‍यावर कारवाई होणार का? अशी मागणी होत आहे.
अधिक माहिती: beed

Best Reader's Review