बेरोजगारीचा महापूर 

होमगार्डच्या २४१ पदांसाठी आठ ते दहा हजार उमेदवार
बीड (रिपोर्टर):- बेरोजगारांची मोठ्या प्रमाणात संख्या असल्याने एक-दोन जागेसाठी शेकडोने अर्ज येतात. गृहविभागाने होमगार्डची भरती सुरू केली. बीडमध्ये २४१ जागांसाठी भरती करण्यात येणार असून आज जिल्हा पोलिस अधीक्षकांनी उमेदवारांना कागदपत्रे घेऊन पोलिस मुख्यालयामध्ये बोलावले होते. जवळपास आठ ते दहा हजार उमेदवार या भरतीसाठी आले होते. 
बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यात २४१ होमगार्डस्‌ची भरती करावयाची आहे. त्यासाठी गृहविभागाने अर्ज मागवले होते.  आज पोलिस मुख्यालयामध्ये इच्छुकांना सर्व कागदपत्रांसह बोलावण्यात आले होते. जिल्हाभरातून जवळपास आठ ते दहा हजार उमेदवार भरतीसाठी आले होते. उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. या वेळी पोलिस अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची उपस्थिती होती. बेरोजगारांची संख्या किती मोठ्या प्रमाणात आहे हे होमगार्डच्या या भरतीवरून दिसून येत आहे. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review