दशक्रिया विधीला जाणारा ट्रक पलटला, ४० जण जखमी

नवगण राजुरी शिवारातील घटना 
बीड (रिपोर्टर):- दशक्रिया विधीला निघालेला ट्रक राजूरी शिवारात पलटी झाल्याने यामध्ये ४० जण जखमी झाले. ही घटना आज सकाळी घडली. जखमींना बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. काल झालेल्या पावसामुळे ट्रक घसरल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात आले. जखमींपैकी काही जणांना गंभीर स्वरुपाचा मार लागला. 
        पाटोदा तालुक्यातील गवळवाडी येथील कुंडलिक सोंडगे यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन (शनिचे) या ठिकाणी ठेवण्यात आला होता. दशक्रियेला जाण्यासाठी सोंडगे कुटुंबियांनी ट्रक किरायाणे केला होता. या ट्रकमध्ये जवळपास ४० ते ५० लोक होते. सकाळी राजूरी शिवारामध्ये ट्रक रोडच्या खाली घसरून पलटी झाला. यामध्ये संताबाई मोरे, जनाबाई पवार, पद्मीन पवार, माधुरी सोंडगे, गजराबाई सोंडगे, मिराबाई चव्हाण, राधाबाई पवार, निवृत्ती सोंडगे, कलावती पवार, कौशल्या शेंडगे, दत्तू खिल्लारेंसह जवळपास ४० जण जखमी झाले. जखमींमध्ये वयोवृद्धांची संख्या जास्त आहे. काही जणांना गंभीर स्वरुपाचा मार लागला. या सर्व जखमींना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले

अधिक माहिती: beed

Best Reader's Review