ताज्या बातम्या

चोरट्याने नगदी रकमेबरोबर बिअर चोरली

चोरट्याने नगदी रकमेबरोबर बिअर चोरली
अंबाजोगाई (रिपोर्टर):- शहरात छोट्या-मोठ्या चोरीच्या घटनांना चोरट्यांकडून सातत्याने अंजाम देण्यात येत असून रात्री नगरपालिकेसमोरील पॅराडाईज वाईन शॉप फोडून अज्ञात चोरट्यांनी नगदी १५ हजार रुपयांबरोबर सोबत एक बिअरची बाटली चोरून नेली. सदरचा चोरटा हा तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या प्रकरणी अंबाजोगाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
    शहरातील नगर परिषदेसमोर पॅराडाईज वाईन शॉपी आहे. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने या वाईन शॉपीच्या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. गल्ल्यातील पंधरा ते वीस हजार रुपये हस्तगत केल्यानंतर चोरट्याने तेथील एक बिअरची बाटली आपल्यासोबत घेतली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सदरच्या चोरीची घटना आज सकाळी उघडकीस आली. त्यानंतर दुकान मालकाने पोलिसात तक्रार दिली. अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक गाढे यांनी दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात रकमा ठेवू नका, असे आवाहन केले. 

अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Best Reader's Review