ताज्या बातम्या

कृषी अधिकारी सूर्यवंशी निलंबीत जाता जाता सीईओ येडगे यांचा दणका

कृषी अधिकारी सूर्यवंशी निलंबीत
जाता जाता सीईओ येडगे यांचा दणका
बीड (रिपोर्टर):- बीड पंचायत समितीमध्ये कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले कृषी अधिकारी सूर्यवंशी यांनी शतकोटी वृक्ष लागवड योजनेमध्ये कोणतेही रेकॉर्ड पंचायत समितीमध्ये ठेवले नाही. झाडे लावली की नाही लावली याची खात्री केली नाही. यासह अनेक बाबतीमध्ये अनियमितता केल्याचा ठपका ठेवत  जाता-जाता दोन दिवसांपूर्वी तत्कालीन सीईओ अमोल येडगे यांनी सूर्यवंशी यांना निलंबीत केले आहे. 
   सूर्यवंशी यांना बीड पंचायत समितीअंतर्गत असलेल्या गावांमध्ये ठरवून दिलेल्या उद्दीष्टाप्रमाणे वृक्ष लागवड झाली की नाही, ज्या ठिकाणी झाली नाही त्याठिकाणी संबंधित सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडून वृक्ष लागवड करून घेणे, प्रत्येक गाववाईज, या वृक्ष लागवडीचे रेकॉर्ड अद्यावत ठेवणे, त्याचा आठ दिवसाचा अहवाल सीईओंना देणे या कामाची जबाबदारी दिलेली होती. या सर्वच कामांमध्ये सूर्यवंशी यांनी अनियमितता केली. सीईओ यांनी ज्या वेळेस या सर्व कामांची पाहणी केली त्या वेळेस कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध झाले नाही. बीड तालुक्यातील तीन गावांना वृक्ष लागवडीच्या कामाला गेल्या आठवड्यामध्ये विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी भेटी दिल्या होत्या. त्यावेळेस या बाबी निदर्शनास आल्या. त्यामुळे येडगे यांनी कृषी अधिकारी सूर्यवंशी यांना निलंबीत केले असून निलंबीत काळात त्यांचे हेडक्वॉर्टर आष्टी पंचायत समितीला दिले आहे. 

अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Best Reader's Review