ताज्या बातम्या

पावसासाठी लिंबारुईत मुस्लिम बांधवांचे रोजे

पावसासाठी लिंबारुईत मुस्लिम बांधवांचे रोजे
बीड (रिपोर्टर):- पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटून गेले तरी बीड जिल्ह्यात पाऊस पडत नाही. परिणामी शेतकरी चिंतातूर झाले असून गावागावात पावसासाठी ईश्‍वर, अल्लाहकडे प्रार्थना केल्या जात आहेत. बीडपासून जवळच असलेल्या लिंबारुई येथे पावसासाठी तीन दिवसांचे रोजा (उपवास) ठेवण्यात आले आहेत. 
बीड जिल्ह्याची दुष्काळी परिस्थिती महाभयंकर होऊन बसली आहे. दोन महिन्यांपासून पाऊस पडत नसल्याने शेतकरी, कष्टकरी, कामगार, मजूर, सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अशा स्थितीत गावागावात लोक भक्ती भावाने ईश्‍वर-अल्लाहकडे प्रार्थना करताना दिसून येत आहेत. बीडपासून जवळच असलेल्या लिंबारुई येथे मुस्लिम बांधवांनी पावसासाठी तीन दिवसांचे रोजा (उपवास) ठेवले असून तिसर्‍या दिवशी दुवॉची नमाज अदा करण्यात येणार आहे. 

अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Best Reader's Review