ताज्या बातम्या

उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार फेर घ्या अन्यथा आत्मदन करणार- जोगदंड

उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार फेर घ्या
अन्यथा आत्मदन करणार- जोगदंड
बीड (रिपोर्टर) :- तालुक्यातील देवीबाभुळगाव येथील सर्वे नं.  ७८/४, गट नं. ३४२ या गटातील एकत्रिकरणाच्या दुरुस्तीबाबत तक्रार दाखल केल्यानंतर जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख, बीड यांनी २८ फेब्रुवारी रोजी आदेश पारीत करुन जोगदंड यांचे नाव ७/१२ उतार्‍यावर घेण्यात आले होते. मात्र त्यानंतर शिंदे यांनी अपिल दाखल केली होती. त्यानुसार भूमि अभिलेख कार्यालय, बीड यांचा आदेश रद्द करुन फेरफार १२१७ रद्द करण्याचा आदेश देण्यात आले होते. या संदर्भात जोगदंड यांनी रिट याचिका दाखल केलेली आहे. या संदर्भात तहिसल कार्यालय, मंडळ अधिकारी व तलाटी यांना फेरफार रद्द करण्याबात कोणतीही कार्यवाही करु नये असा लेखी अर्ज दि. ६ जुन रोजी दिला आहे. मात्र शिंदे यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना राजकीय दबावाखाली व आर्थिक लोभाच्या अमिषाने फेरफार रद्द करुन घेतला. या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती (स्टे) दिला आहे. त्यामुळे परत अर्जदार यांचे नांव फेरफारला घेण्यात यावे अन्यथा आठ दिवसात तलाठी सज्जा जेबापिंपरी या ठिकाणी केव्हाही विषारी औषध घेवून आत्मदह करण्यात येईल असा इशारा रामदास धोंडीबा जोगदंड यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review