ताज्या बातम्या

मुख्य आरोपीच्या अटकेसाठी धारुर कडकडीत बंद

नामदेव शिनगारे खून प्रकरण : नातेवाईकांनी शवविच्छेदन रोखले, अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर तळ ठोकून
बीड (रिपोर्टर) :- पैशाच्या देवाणघेवानीवरुन काल धारुरच्या माजी नगराध्यक्षा सविता शिनगारे यांचे पती नामदेव शिनगारे यांचा तीघा जणांनी दगडाने ठेचून खून केल्याची सनसनी निर्माण करून सोडणारी घटना उघडकीस आली होती. त्या प्रकरणी तिव्र पडसात उमटत असून मुख्य आरोपींना अटक करण्यासाठी आज धारुन शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले तर नातेवाईकांनी शवविच्छेदनही रोखले असल्याचे धारुर शहरासह ग्रामीण रुग्णालयात तनावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील दोन आरोपीच्या रात्री उशिरा पोलिसांनी मुसक्या आवळ्या आहेत.

काही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर घटनास्थळी तळ ठोणून आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार धारुरच्या माजी नगराध्यक्षा सविता शिनगारे यांचे पती नामदेव शिनगारे यांनी मुख्य आरोपी सुखदेव प्रभाकर फुन्ने याला त्याच्या मुलीच्या लग्नासाठी काही पैसे दिले होते. ते पैसे परत द्यावेत अशी मागणी शिनगारे हे आरोपी फुन्ने याच्याकडे करत होते. याच कारणावरुन सुखदेव प्रभाकर फुन्ने, गणेश शिवाजी घोडके, शुभम शिंदे या तिघांनी संगनमत करुन काल चार ते पाच वाजता नामदेव शिनगारे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. यावेळी दोघे फरार झाले तर एक आरोपी किरकोळ जखमी झाला होता. त्याला पोलिसांनी रात्री रुग्णालयातून ताब्यात घेतले तर एकाला धारुर शहरातून ताब्यात घेण्यात आले. मुख्य आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे. मुख्य आरोपीला तत्काळ अटक करावे या मागणीसाठी आज धारुर शहर कडकडीत बंद ठेवण्यात अले. तर शवविच्छेदनही नातेवाईकांनी रोखल्यो धारुरच्या ग्रामीण रुग्णालयासह शहरात तनावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी धारुर पोलिस ठाण्यात ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पीएसआय माळी हे करत आहेत

अधिक माहिती: beed

Best Reader's Review