ताज्या बातम्या

शिक्षक गेले संपावर वडवणीत विद्यार्थी आले रस्त्यावर 

शिक्षक गेले संपावर वडवणीत विद्यार्थी आले रस्त्यावर 
तहसिल कार्यालयावर मोर्चा
सरकार विरोधात विद्यार्थ्याच्या घोषणा
वडवणी (रिपोर्टर):- राज्यासह जिल्ह्यातील विनाअनुदानित शाळा व विद्यालयातील शिक्षक बेमुदत संपावर गेल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याला सर्वस्व सरकार मधील मुख्यमंञी व शिक्षणमंञी जबाबदार असून शिक्षकांचे प्रश्न तात्काळ सोडावे यासाठी वडवणी शहरातील सर्वच शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी भिकमांगो आंदोलन करत मोर्चा तहसिल कार्यालयावर काढला.
                                      दिनांक ५ ऑगस्ट पासून राज्यातील विनाअनुदानित शाळा व महाविद्यालयातील सर्वच शिक्षक बेमुदत संपावर गेले असल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे.म्हणुन आज शहरातील आंबेडकर चौक ते छञपती शिवाजी महारज चौक मार्ग हा मोर्चा वडवणी तहसिलवरा धडकला यामध्ये सर्वच शाळा,महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यापार्‌यांना भिक मागात देणगी गोळा केली आहे.आणि हि देणगी तहसिलदार मार्फत शिक्षण मंञ्यांना पाठविण्यात आली आहे.तर तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे कि,विनाअनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय विभाग वर्ग व तुकड्या यांची शंभर टक्के आर्थिक तरतुदी कराव्यात व विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे,मराठवाडा विभागातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्यात करावे, मराठवाडा विभागातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीमुळे सर्व विद्यार्थ्यांना एसटी बस पास मोफत देण्यात याव्यात, मराठवाडा विभागातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक शिष्यवृत्ती मध्ये वाढ करून ती विद्यार्थ्यांना विनाविलंब तात्काळ देण्यात यावी यासह इतर मागण्याचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले आहे.तर या मोर्चात शिक्षण आमच्या हक्कांच नाही कुणाच्या बापाच,शिक्षक गेले संपावर विद्यार्थी आले रस्त्यावर यासह सरकार विरोधात विद्यार्थ्यानी घोषणा दिल्या.तर यामध्ये शेकडो विद्यार्थी व विद्यार्थीनीनी सहभाग नोंदवत शिक्षक व विद्यार्थ्याचे प्रश्न तात्काळ सोडावेत अन्यथा आज विद्यार्थी आले आहेत पुढील काळात कुंटुबांना हि सोबत घेऊन यापेक्षा हि तिव्र आंदोलन करु अशा इशारा यावेळी विद्यार्थ्यानी दिला आहे.

मागण्या मान्य करा अन्यथा बेमुदत उपोषण - राहुल कांबळे 
गेल्या १९ वर्षापासून विनाअनुदानित शाळेवर काम करत आहोत.’माय जगू देईना अन् बाप मरु देईना’ अशी अवस्था आज शिक्षक बांधवावर आली आहे.याकडे सरकार साफ दुर्लक्ष करत असल्यानेच हे बेमुदत उपोषणाचं हत्यार उपसावे लागले आहे.हे आंदोलन राज्यभर सुरु आहे.आमच्या मागण्या १५ ऑगस्ट पर्यत सरकारने मान्य न केल्यास १६ ऑगस्ट पासून आम्ही शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत अमर उपोषण करणार आहोत अशा इशारा वडवणी येथील महाराणी ताराबाई विद्यालयातील शिक्षक राहुल कांबळे यांनी दिला आहे.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review