ताज्या बातम्या

ग्रामसेवकांचे जि.प. कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

ग्रामसेवकांचे जि.प. कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
बीड (रिपोर्टर):- ग्रामसेवकांच्या मागण्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याने जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांनी आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. ग्रामसेवक संवर्गास प्रवास भत्ता शासन निर्णयाप्रमाणे मंजूर करण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. 
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन संघटनेच्या वतीने ग्रामसेवकांच्या प्रश्‍नांबाबत सातत्याने आवाज उठवला जात असला तरी संघटनेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. आज जिल्हाभरातील सर्वच ग्रामसेवकांनी एकत्रित येऊन जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी पद रद्द करण्यात येऊन फक्त पंचायत विकास अधिकारी पद निर्मित करण्यात यावे, सन २००५ नंतरचे ग्रामसेवक यांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी सदरील आंदोलन करण्यात येत आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष बळीराम उबाळे, सरचिटणीस भगवानराव तिडके, मधुकर शेळके, देशमुख, चोपडे, जाधव, मिसाळ, नागरे, चव्हाण, पुजारी, कांबळे, चौधरी, आडागळे, हुले, गायकावड, रांजणकर, नन्नवरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review