ताज्या बातम्या

बीड तालुक्यातही शौचालयातील भ्रष्टाचार उघड

बीड तालुक्यातही शौचालयातील भ्रष्टाचार उघड
बीड (रिपोर्टर):- बीड तालुक्यातील कळसंबर आणि सौंदाणा या दोन गावामध्ये जवळपास दीडशे बोगस फोटो अपलोड करून या शौचालयाचे पैसे उचलण्यात आले आहे. ही रक्कम जवळपास १८ लाखााच्या घरात जाते. गेवराईनंतर आता बीडलाही याची लागण झाली असून गेवराईची कसलीही चौकशी न झाल्याने कंत्राटी कर्मचार्‍यांचे मनोधैर्य वाढले असून आता बीडमध्येही जवळपास दीडशे शौचालयाचा घोटाळा उघड झाला आहे. 
गेवराई तालुक्यातील अनेक गावामध्ये शौचालयातील भ्रष्टाचार उघड झाल्यानंतरही याची जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांनी दखल न घेतल्याने आता बीडमध्येही शौचालयामधील भ्रष्टाचार उघडकीस येत असून बीड तालुक्यातील कळसंबर येथील शंभर शौचालयाचे बोगस फोटा अपलोड करून त्याचे पैसे उचलण्यात आले. वास्तविक पाहता शौचालयाचे फोटा अपलोड करतांना शौचालयावर त्या व्यक्तीचे नाव, त्याचा प्रभाग क्रंमाक, त्यासोबत त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीचा फोटा असणे बंधनकारक आहे. मात्र तसे न करता एकच फोटो अनेक ठिकाणी वापरून हे फोटो अपलोड करण्यात आले. असाच प्रकार सौंदाणा येथेही घडला आहे. सौंदाणा येथे पन्नास शौचालयाचे बोगस फोटो टाकून बील उचलण्यात आले. हे पैसे नेमके लाभार्थीला देण्यात आले की परस्पर उचलण्यात आले हे समजले नसले तरी बोगस फोटो टाकून पैसे उचलण्याचा हेतू नेमका काय? हे स्पष्ट होत आहे. संबंधित व्यक्तीला याबाबत कसलीही माहिती नसते. परस्पर नावे टाकून आणि परस्पर बोगस फोटो टाकून हे पैसे एखाद्या पतसंस्थेमध्ये बोगस खाते काढून उचलले जातात. या दोन गावांचा प्रकार उघडकीत आला. मात्र तालुक्याती आणखी असे किती गावे आहेत याचा शोध मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार यांनी घ्यावा. बीड तालुक्यामध्ये जवळपास १ हजार शौचालय बोगस दाखवून पैसे उचलल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. कंत्राटी कर्मचार्‍यांच्या मदतीने हा प्रकार सर्रास चालू असून आणखी किती तालुक्यात असा प्रकार घडलेला आहे याचाही शोध मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार व उपमुख्य कार्यकारी अधिकारी काकडे यांनी घ्यावा. काकडे आणि कुंभार यांची काही कर्मचार्‍यांकंडून दिशाभूल केली जात असून असा काही प्रकार घडलाच नाही असे वारंवार बींबवले जात आहे. जिल्हास्तरीय कर्मचार्‍यांचे तालुकास्तरावर लागेबांधे असून जिल्हास्तरावर एखादा निर्णय झाला की त्याच दिवशी तालुकास्तरावर तो कर्मचार्‍यांचा कसा समजतो याचाही शोध अधिकार्‍यांनी घेणे गरजेचे आहे. 
 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review