ताज्या बातम्या

कारखान्याची उचल फेडली नाही; मुकादमाने ऊसतोड कामगाराचे डोके फोडले

तिघांविरोधात गुन्हा दाखल अंबाजोगाई (रिपोर्टर):- तालुक्यातील काळविट तांडा येथील ऊसतोड कामगार गेल्या वर्षी मुकादमाकडून उचल घेऊन ऊसतोडणीस गेला होता. या उचलीतील अर्धीच रक्कम फेडली व उर्वरित रक्कम ऊसतोड कामगाराकडे फिरलेली आहे. या रकमेची मागणी मुकादमाने या कामगाराकडे केली मात्र पैशे नसल्याने संबंधिताने रक्कम देण्यास असमर्थता दर्शविल्याने तिघा जणांनी या कामगारास बेदम मारहाण केली. यात त्याचे डोके फुटले आहे. त्याला उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले आहे. काळविट तांडा येथील देवीदास रामभाऊ राठोड याने नितीन सुरेश राठोड या ऊसतोड मुकादमाकडून काही पैसे उचली स्वरुपात घेऊन गेल्या वर्षीय ऊसतोडणीसाठी गेला होता. मात्र या ऊसतोडणीतून रामभाऊचे अर्धेच पैसे फिटले होते व अर्धे पैसे राहिले होते. उर्वरित पैशांच्या मागणीसाठी नितीन राठोड आपला भाऊ सचिन आणि एक नातेवाईक लहु चव्हाण यांच्या सोबत देवीदास याच्याकडे वारंवार जावून राहिलेल्या रकमेसाठी तगादा लावत होता. मात्र देवीसा हे पैसे देण्यासाठी नकार देत असल्याने काल रात्री या तिघा जणांनी मिळून देवीदास याला बेदम मारहार केली. यात त्याचे डोके फुटल्याने त्याला अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवीदासच्या फिर्यादीवरून वरील तिघांविरुद्ध अंबाजोगाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती: beed

Best Reader's Review