ताज्या बातम्या

२६ तारखेला कोर्टासमोर काळ्यापट्‌ट्या बांधून बसणारच -गंगाभीषण थावरे

 

मला नोटीस बजावण्यापेक्षा कारखान्याला पैसे देण्याचे आदेश द्या

बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यातील कारखानदारांनी एफआरपीची रक्कम शेतकर्‍यांना दिली नसल्याने त्या रक्कमेसाठी २६ तारखेला गंगाभीषण थावरे औरंगाबाद येथील न्यायालयासमोर शेतकर्‍यांसमवेत काळ्या पट्‌ट्या लावून बसणार आहेत. याबाबत पोलीसांनी थावरे यांना नोटीस बजावली. थावरे मात्र आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. मला नोटीस बजावण्यापेक्षा कारखानदारांना नोटीस बजवावी आणि शेतकर्‍यांचे पैसे तात्काळ देण्याचे आदेश द्यावेत असे थावरे यांनी म्हटले आहे. 
बीड जिल्ह्यातील कारखानदाराकडे शेतकर्‍यांची कोट्यवधी रूपयाचंी थकबाकी आहे. या थकबाकीसाठी थावरे कोर्टामध्ये गेले होते. कोर्टाने साखर संचालकांना पैसे देण्याचे आदेश दिले होते. मात्र पैसे मिळाले नाही. पैसे मिळाले नसल्याने थावरे यांनी २६ ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथील न्यायालयासमोर तोंडाला काळ्या पट्‌ट्या लावून बसणार असल्याचा इशारा दिला होता. थावरे यांनी आंदोलन करू नये, त्यांच्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निार्मण होवू शकतो. शेतकर्‍यांना तोंडाला काळ्या पट्‌ट्या बांधून कोर्टासमोर  बसता येणार नाही या आशयाची नोटीस थावरे यांना माजलगाव शहर पोलीसांनी बजावली आहे. पोलीसांनी आपणास नोटीस बजावण्यापेक्षा कारखानदारांना बजवावी. कारखानदारांनी पैसे दिल्यानंतर आम्ही काशाला आंदोलन करू असे थावरे यांनी सांगितले. नोटीस बजावली असली तरी शेतकरी २६ तारखेला कोर्टासमोर बसणार असल्याचे गंगाभीषण थावरे यांनी सांगितले. 

माजलगाव कारखान्याने दिला शंभर रूपया प्रमाणे हप्ता
माजलगाव सहकारी साखर कारखान्याकडे तालुक्यातील शेतकर्‍यांचे कोट्यवधी रूपये थकीत आहेत. आंदोलनामुळे गेल्या वेळेस शंभर रूपयाप्रमाणे पैेसे शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले होते. आता पुन्हा शंभर रूपयाप्रमाणे पैसे जमा करण्यात आले. इतर कारखान्याने मात्रअद्यापही पैसे दिलेले नाहीत. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review