ताज्या बातम्या

घाटसावळीत शेतकरी संघटनेचा रस्ता रोको

घाटसावळीत शेतकरी संघटनेचा रस्ता रोको घाटसावळी (आनंद लांडे):- पावसाळा सुरू होवून अडीच महिने होत आले, अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने खरीप पिकाची राखरांगोळी झाली आहे. शासनाने खरीप पीकांचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी यासह इतर मागण्यासाठी आज घाटसावळी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती. गेल्या वर्षीची दुष्काळी परिस्थिती यावर्षी कायम राहते की काय? असा प्रश्‍न निर्माण झाला. पावसााळा सुरू होवून अडीच महिने झाले तरी जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने खरीप पीकाची राखरांंगोळी झाली. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. शासन शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करत असून होरपळलेल्या पीकांचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी यासह इतर मागण्यासाठी घाटसावळी येथे बीड परळी रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अनेक शेतकर्‍यांचा सहभाग होता. मागण्याचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले. अधिक माहिती: beed reporter

Best Reader's Review