ताज्या बातम्या

आयपीसीसी परीक्षेत आदिल खानचे यश

आयपीसीसी परीक्षेत आदिल खानचे यश सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव बीड (रिपोर्टर):- द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउन्टंटस् ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या आयपीसीसी परीक्षेत आदील खान या विद्यार्थ्याने यश संपादन केल्याने त्याचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. येथील प्रतिथयश लेखापरिक्षक, कर सल्लागार तथा धर्मादाय जगतचे संपादक डी.बी. खान यांचे सुपूत्र आदिल खान याने द इन्टि्‌ट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउन्टंटस् ऑफ इंडियाच्या परीक्षेत यश संपादित केले आहे. आदिल खान यांनी स्वयं अध्यनावर भर देत हे यश संपादीत केले. अतिशय कठीण अशा या परीक्षेत आदिल याने यश मिळवल्याने त्यांचे राज्यभरातील लेखापरिक्षक, मित्र परिवाराने अभिनंदन केले. त्याचबरोबर सायं.दैनिक बीड रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब व रिपोर्टर परिवाराने आदिल खान यांचे त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करत कौतुक केले. अधिक माहिती: beed reporter

Best Reader's Review