ताज्या बातम्या

कर्जबाजारी शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या

कर्जबाजारी शेतकर्‍याची विष पिऊन आत्महत्या गेवराई (रिपोर्टर):- कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून एका ५५ वर्षीय शेतकर्‍याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना महांडुळा येथे घडली. या शेतकर्‍याकडे बँकेसह खासगी लोकांचे कर्ज असल्याचे सांगण्यात आले. बीड जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस पडला नसल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. त्यातच गेल्या वर्षी भीषण दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. यावर्षी पीकपाणी व्यवस्थीत आलेले नाहीत तसेच लोकांचे देणे कसे फेडायचे या चिंतेतून महांडुळा येथील भीमराव नारायण घाडगे (वय ५५) या शेतकर्‍याने काल विषारी औषध प्राशसन केले होते. त्यास गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान आज सकाळी या शेतकर्‍याचा मृत्यू झाला आहे. अधिक माहिती: beed reporter

Best Reader's Review