ताज्या बातम्या

मराठवाड्यासह बीड जिल्ह्यावरचा दुष्काळ दूर होऊ दे

मराठवाड्यासह बीड जिल्ह्यावरचा दुष्काळ दूर होऊ दे अजित पवार, अमोल कोल्हेंचे प्रभू वैद्यनाथाला साकडे परळी (रिपोर्टर):- मराठवाड्यासह बीड जिल्ह्यातला दुष्काळ दूर होऊ दे, बीड जिल्ह्यात भरपूर पाऊस होऊ दे म्हणत प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक होत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. अमोल कोल्हे यांनी आज सकाळी प्रभू वैद्यनाथाला पावसासाठी साकडे घातले. या वेळी त्यांच्या सोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हेही उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ‘शिवस्वराज्य’ यात्रेनिमित्त माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. अमोल कोल्हे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर कालपासून बीड जिल्ह्यात आहेत. रात्री परळी येथील जाहीर सभेनंतर परळी मुक्कामी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी आज सकाळी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात जावून भक्तीभावाने दर्शन घेतले. या वेळी अजित पवार, अमोल कोल्हे यांनी मराठवाड्यासह बीड जिल्ह्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊ दे, बीड जिल्ह्यात भरपूर पाऊस पडू दे, इथला कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळा, सर्वसामान्य सुखी-समाधानी होऊ दे, असे साकडे प्रभू वैद्यनाथाला घातले. या वेळी मंदिर प्रशासनाचे सचिव राजेश देशमुख यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक प्रदेश उपाध्यक्ष अजय मुंडे, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, चंदूलाल बियाणी, राजेंद्र सोनी, शंकर कापसे, महादेव रोडे, संतोष शिंदे, सुरेश टाक, अनंत इंगळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. चिक्कीताईची श्वेतपत्रिका जाहीर करा -रुपाताई चाकणकर अंबाजोगाईच्या मोंढा मैदानात राष्ट्रवादीची विराट सभा सुरू अंबाजोगाई (रिपोर्टर):- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सुरू असलेली शिवस्वराज्य यात्रा आज अंबाजोगाईत डेरेदाखल झाली. मोंढा मैदान येथे विराट जाहीर सभा सुरु असून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाताई चाकणकर यांनी चिक्की ताईंची श्वेतपत्रिका जाहीर करा, असे म्हणत पालकमंत्री पंकजा मुंडेंसह सरकारवर हल्ला चढवला. सभेपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरातून जबरदस्त मोटारसायकल रॅली काढली. सभा अद्याप सुरू असून वेळेअभावी सभेचा इतिव्रतांत देता आला नाही. अंबाजोगाईच्या मोंढा मैदानात शिवस्वराज्य यात्रेची विराट जाहीर सभा दुपारी एक वाजता सुरू झाली. सभेपूर्वी शहरातून मोटारसायकल रॅली काढून राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोठे शक्तीप्रदर्शन केले. व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. अमोल कोल्हे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाताई चाकणकर, अमोल मिटकरी, नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी नमिता मुंदडा यांनी प्रास्ताविक केले. रुपाताई चाकणकर यांनी चिक्कीताईची श्वेतपत्रिका जाहीर करा, असे म्हणत पालकमंत्री पंकजा मुंडेंसह सरकारवर हल्ला चढवला. अधिक माहिती: beed reporter

Best Reader's Review