केज नगर पंचायत कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन नगरपालिका कार्यालयासमोर मांडला ठिय्या

केज नगर पंचायत कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन
नगरपालिका कार्यालयासमोर मांडला ठिय्या
केज (रिपोर्टर):- नगरपंचायत अंतर्गत काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने कर्मचार्‍यांनी कामकाज बंद करून न.प. कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामध्ये कर्मचार्‍यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 
   गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचार्‍यांच्या मागण्या प्रशासन मार्गी लावत नसल्याने संघटनेच्या वतीने शासनाकडे निवेदन दिले, आंदोलन केले मात्र याची दखल घेतली जात नसल्याने कर्मचार्‍यांनी कामकाजावर बहिष्कार टाकून न.प. कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. या वेळी लेखापाल जगताप, कदम, खतिब, राऊत, ससाने, सय्यद आदी महिला, पुरुष कर्मचार्‍यांची उपस्थिती होती. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review