ताज्या बातम्या

भ्रष्ट नगरपालिकेचे विशेष लेखा परिक्षण करावे  बीड न.प.चा जळगाव पॅटर्न होणार -शेख निजाम

भ्रष्ट नगरपालिकेचे विशेष लेखा परिक्षण करावे 
बीड न.प.चा जळगाव पॅटर्न होणार -शेख निजाम

बीड (रिपोर्टर):-बीड नगर पालिकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचार प्रकरणाचे विशेष लेखा परिक्षण करण्यात यावे, अशी मागणी करत बीड न.प.च्या भ्रष्टाचार प्रकरणाबाबत जळगाव पॅटर्न होवून भ्रष्ट क्षीरसागरांना जबरदस्त धक्का बसणार असल्याचे एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख निजाम यांनी म्हटले आहे. 
   आज निजाम यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, नगरपालिकेच्या भ्रष्ट प्रणालीविरोधात आपण न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे, न्यायालयाने नगरपालिकेकडून अभिप्राय मागवला असून बीड न.प.ची अवस्था जळगावसारखी होणार असून सत्तेच्या धुंदीत असलेल्या क्षीरसागरांना भ्रष्टाचार प्रकरणी जबरदस्त धक्का बसणार आहे. यापूर्वी लेखा परिक्षण झाले, 
त्यात त्रुटी आढळून आलेल्या आहेत, मात्र विशेष लेखापरिक्षण होणे गरजेचे असल्याचे निजाम यांनी म्हटले आहे. न.प.च्या सत्तेत एमआयएमचे सात सदस्य सहभागी आहेत, याबाबत विचारले असता त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केलेला आहे, त्यांना आम्ही यापूर्वीच नोटीस बजावले असल्याचे सांगितले. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review