आ विनायकराव मेटेंच्या प्रयत्नातून दुष्काळात होळपणार्‍या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार

eReporter Web Team

आ विनायकराव मेटेंच्या प्रयत्नातून दुष्काळात होळपणार्‍या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार
बीड पं.स. अंतर्गत असलेल्या बुडीत क्षेत्रातील ११६ 
सार्वजनिक विहिरींना मिळाली मंजुरी-सभापती कोकाटे
बीड (रिपोर्टर):येन पावसाळ्यातही बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात पिण्याचा पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. जिल्हा सातत्याने अवर्षण, दुष्काळाचा सामना करत आहे. अशात अण्णात माती कालवण्याचे काम बीडमध्ये काही लोकांकडून केले जाते आहे. मात्र तरीही विभागीय आयुक्त केंद्रेकर यांच्याकडे तसेच जिल्हाधिकार्‍यांकडे सातत्याने आ विनायकराव मेटे यांनी या विहिरी व्हाव्यात यासाठी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून बीड पंचायत समितीअंतर्गत ११६ बुडीत क्षेत्रातील सार्वजनिक विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. या विहिरी तात्काळ सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांकडे आयुक्तांनी दिले असून दुष्काळात होळपणार्‍या गावांचा पाणीप्रश्न आ विनायकराव मेटे यांच्या प्रयत्नातून तसेच पाठपुराव्यातून मार्गी लागणार आहे. असे पंचायत बीड सभापती मनीषाताई कोकाटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. 
बीड तालुक्यात विकास व्हावा म्हणून आ विनायकराव मेटे यांनी सातत्याने प्रयत्न केले मात्र बीडमधील बेरोजगार मंत्र्यांना विकास व्हावा असे अजिबात वाटत नाही. बीड पंचायत समितीअंतर्गत ८३२ विहिरींपैकी ७०५ विहिरींचे काम पूर्ण झाले असून अकुशल देयके अदा करण्यात आले मात्र कुशल देयकेअदा करण्यात येऊ नये म्हणून बीडच्या बेरोजगार मंत्र्यांनी ८३२ वैयक्तिक विहिरींच्या देयकांमध्ये आडवे येत गोरगरिब शेतकर्‍यांच्या अन्नात माती कालवण्याचे काम केले आहे. असा आरोप सभापती कोकाटे यांनी केला आहे. यामध्ये देण्यात आलेल्या सर्व विहिरी ह्या पक्षपात, जातीपात न मानता देण्यात आलेल्या होत्या. बीड तालुक्यातील काही गावांमध्ये दुष्काळी पार्श्वभूमीमुळे आजही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दुष्काळानंतर पुन्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पुन्हा पाणीप्रश्न भेडसावत आहे. आ विनायकराव मेटे यांनी याबाबतीत बुडीत क्षेत्रात सार्वजनिक विहिरी करण्यात याव्यात यासाठी राज्य शासन, आयुक्त केंद्रेकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यातून आता बीड तालुक्यातील पंचायत समितीअंतर्गत असलेल्या ११६ सार्वजनिक विहिरींना मंजुरी देत गावोगावच्या पाणीप्रश्न मिटवण्यात मोठा हातभार लावला आहे. आ विनायकराव मेटे यांनी दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी धोरण ठरवत दूरदृष्टीने हा निर्णय व्हावा यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाले आहेत. आ. विनायकराव मेटे यांचे सर्वस्तरातून तसेच ग्रामीण भागातून आभार मानण्यात येत आहे. या विहिरी तात्काळ सुरु होणार असल्याची माहिती सभापती कोकाटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
 


अधिक माहिती: beed

Related Posts you may like