कासारी एक महिन्यापासून अंधारात

कासारी एक महिन्यापासून अंधारात
लोकप्रतिनिधींसह अधिकार्‍यांचे दुर्लक्ष
केज (रिपोर्टर):- डीपी खराब झाल्याने तो अद्यापही दुरुस्त करण्यात आला नसल्याने तब्बल एक महिन्यापासून कासारी गाव अंधारात आहे. गावात वीज नसल्याने नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. डीपी दुरुस्ती करण्याकडे लोकप्रतिनिधींसह अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्याने गावकर्‍यात संताप व्यक्त केला जात आहे. 
   केज तालुक्यात असलेल्या कासारी गावाचा डीपी एक महिन्यापूर्वी जळालेला आहे. डीपी खराब झाल्यानंतर तो तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना वीज वितरण कंपनीच्या असतात मात्र महिना ते दीड महिना डीपी दुरुस्त करून मिळत नसल्याने तोपर्यंत गावकर्‍यांना अंधारात रहावे लागते. कासारीचा डीपी एक महिना झाला तरी अद्याप दुरुस्त झाला नाही. महिन्यापासून गाव अंधारात असल्याने नागरिकांना विजेअभावी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पाण्याची विद्युत मोटार, पिठाची गिरणी हे उपकरणे बंद असल्याने गावकर्‍यांना इतर ठिकाणाहून पाणी आणि धान्य दळून आणावे लागत आहे. डीपीच्या दुरुस्तीबाबत केजचे लोकप्रतिनिधी आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने गावकर्‍यात संताप व्यक्त केला जात आहे. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review