खडसे पुढच्या मंत्रिमंडळात असावेत -पंकजा मुंडे

खडसेंवर अन्याय झाला की नही हे सांगण्याच्या भूमिकेत नाही
...पण ते पुढच्या मंत्रिमंडळात असावेत -पंकजा मुंडे
मुंबई (रिपोर्टर):- भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर अन्याय झाला की नाही हे बोलण्याच्या भूमिकेत मी नाही. पण त्यांच्या बाबतीतले विषय मार्गी लागावे आणि त्यांनी आमच्यासोबत यावे.मंत्री मंडळात ते मंत्री असावे असे मत भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपानंतर त्यांना मंत्री पद सोडावे लागले होते. त्यानंतर ते पुन्हा मंत्री मंडळात सहभागी झालेले नाहीत. आता त्यांना पुढील सरकारमध्ये मंत्री मंडळात सहभागी करून घेण्याबाबत मुंडे यांनी म्हटले आहे की, मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, पुढच्या मंत्री मंडळात खडसे मंत्री मंडळात दिसावे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. नाथा भाऊंवर अन्याय झाला की नाही हे बोलण्याच्या भूमिकेत मी नाही पण त्यांच्या बाबतचे विषय मार्गी लागावे आणि त्यांनी आमच्यासोबत यावे असे त्यांनी सांगितले. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review