वार्ड क्र. ८ मध्ये पाय ठेवायला जागा नाही राऊंडला डॉक्टर आले १२ वाजता 

वार्ड क्र. ८ मध्ये पाय ठेवायला जागा नाही
राऊंडला डॉक्टर आले १२ वाजता 
बीड (रिपोर्टर):- जिल्हा रुग्णालयातल्या अनेक वार्डांमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. काही रुग्णांना कॉट मिळत नसल्याने त्यांना जमीनीवरच झोपावे लागते. वार्ड क्र. ८ मध्ये रुग्णांची इतकी संख्या आहे की, पाय ठेवायला जागा नाही. राऊंडचा वेळ सकाळचा असताना आज दुपारी १२ वाजता राऊंडचे डॉक्टर आले होते. डॉक्टरांच्या वेळेबाबत काही वेळापत्रक आहे की नाही? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी याकडे लक्ष देऊन राऊंडच्या डॉक्टरांना वेळेनुसार राऊंड घ्यावा, जेणेकरून रुग्णांची हेळसांड होणार नाही. 
   बीडच्या जिल्हा रुग्णालयात शेकडो रुग्ण आंतररुग्ण विभागात उपचार घेत असतात. त्यातील काही रुग्ण गंभीर असतात. गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले तर त्यांचे प्राण वाचू शकतात. हलगर्जीपणामुळे आतापर्यंत अनेक रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. जिल्हा रुग्णालय भव्यदिव्य असले तरी काही वार्डांमध्ये खचाखच गर्दी असते. वार्ड क्र. ८ मध्ये पाय ठेवायला जागा नाही. काही रुग्ण खाली झोपून उपचार घेतात. त्यातच डॉक्टरांचा निष्काळजीपणा पहावयास मिळतो. आज दुपारी १२ वाजता राऊंडचे डॉक्टर आले होते. डॉक्टरांना वेळेचे काही बंधन आहे की नाही? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. डॉक्टरांच्या वेळेबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी लक्ष घालून रुग्णांना वेळेवर उपचार करण्याचे सक्तीचे आदेश द्यावेत जेणेकरून रुग्णांची हेळसांड होणार नाही. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review