तीनही मतदार संघात शिवसेनेचं काम वाढवणार-बाळासाहेब अंबुरे

तीनही मतदार संघात शिवसेनेचं काम वाढवणार-बाळासाहेब अंबुरे
बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यातल्या सहाही मतदार संघात शिवसेनेची ताकद प्रचंड प्रमाणात वाढत आहे. गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेत काम करतांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा घराघरात नेण्याचे काम केले आहे. आता शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केज, परळी,माजलगाव विधानसभा मतदार संघाची जबाबदारी माझ्यावर टाकली असून या तीनही मतदार संघात शिवसेनेचे काम मोठ्या प्रमाणावर वाढवणार असल्याचे नुतन संपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे यांनी सांगितले. 
      गेल्या वीस वर्षापासून शिवसैनिक म्हणून काम करतांना पक्षाच्या उपजिल्हाप्रमुखपदी राहून जिल्हाभरात शिवसेनेचे काम आजपर्यंत वाढवले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घराघरात गेले आहेत. पक्षाने दिलेली जबाबदारी आजपर्यंत पूर्ण करत आलो आहे. आता केज,परळी, माजलगाव विधानसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर टाकली आहे. ती जबाबदारी सार्थकी लावण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याचे बाळासोब अंबुरे यांनी सांगितले. आज जिल्ह्यात शिवसेनेची ताकद प्रचंड प्रमाणात वाढत आहे. परळी, केज आणि माजलगाव या तीनही मतदार संघात आणि सहा तालुक्यात शिवसेनेच्या शाखा गावागावात उभारणार असून उद्याच्या निवडणूकीत जास्तीत जास्त मतदान 
शिवसेनेला कसे घेता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. शिवसेनेने आजपर्यंत माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकावर विश्‍वास ठेवून मला पक्षाचे वेगवेगळे पद दिले आहे. त्यांचा विश्‍वास अधिक दृढ करण्याच्या इराद्याने आपण कामाला लागल्याचे अंबुरे यांनी सांगितले. संपर्क प्रमुखपदी निवड झाल्यानंतर अंबुरे लागलीच तीनही मतदार संघात कामाला लागले आहेत. तेथील पदाधिकार्‍यांशी संवाद साधून निवडणूकीमध्ये पक्ष सांगेल त्या पद्धतीने काम करायचे असून त्यासाठी गावगावात शिवसेनेचे विचार गेले पाहिजेत, घराघरामध्ये शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भूमिका गेली पाहिजे यासाठी आपण कामाला लागल्याचही अंबुरे यांनी सांगितले.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review