ताज्या बातम्या

राज्य उत्पादन शुल्कच्या अंबाजोगाई व धारूर तालुक्यात धाडी १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्कच्या अंबाजोगाई व धारूर तालुक्यात धाडी
१ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
बीड (रिपोर्टर)

विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहीता काल लागू झाल्यानंतर आज  अंबाजोगाई  येथील चनई तांडा व धारुर येथील आसरडोह येथे अवैधरित्या हातभट्टी मद्य व ताडी निर्मिती व विक्री होत असल्याची माहिती मिळताच  आज राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून १ लाख २ हजार ९६ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. तर काही कच्चा माल जागेवरच नष्ट करण्यात आला.
यामध्ये ३ हजार ८०० लिटर रसायन, २५ लिटर तयार हातभट्टी दारू, ८.६४ ब.लिटर देशी मद्य, २९५ लिटर ताडी, १९ बॅरल (२०० लिटर), ४ टोपली,३ प्लास्टिक कॅन, ८ जार असा एकूण १ लाख २ हजार ९६- रूपयसचा मुद्देमाल जप्त करून त्यातील काही जागेवरच नष्ट करण्यात आला. सदरच्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड, जवान बि. के.पाटील, वाहन चालक के.एन.डुकरे यांनी सहभाग घेतला. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर कारवाई  नितीन धार्मिक अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वात विविध ठिकाणी अवैध हातभट्टी, ताडी निर्मिती केंद्रे तसेच रस्त्यालगतचे धाबे व हॉटेल यांच्यावर धडक कारवाई करण्यात येत आहे.  मद्य विक्री अनुज्ञप्ती मधून मद्याच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ आढळून आल्यास सदर दुकानाचे सखोल निरीक्षण करून त्याच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. तेव्हा सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती धारकांनी अनुज्ञप्ती च्या अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करावे असे अवाहन करण्यात आले आहे

---
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीन पथके तयार करण्यात आली असून प्रत्येक पथकात निरीक्षक दर्जाचा अधिकारी व दोन दुय्यम निरीक्षक तसेच जवान व वाहन चालक यांचा समावेश आहे. अवैध मद्य विक्रीबरोबरच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अबकारी अनुद्यप्त्‌यांच्या मद्य विक्रीच्या व्यवहारांवरही या विभागाची करडी नजर आहे. मद्य विक्री दुकानांमधील दैनंदिन मद्य विक्री ची माहिती मागविण्यात येत असून सदर माहिती निवडणूक विभागाला पाठवली जात आहे.
     नितीन धार्मिक
      राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक,बीड

अधिक माहिती: beed

Best Reader's Review