ताज्या बातम्या

भाजपात गेलेले दीपक जाधव एकाकी समर्थक राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल 

भाजपात गेलेले दीपक जाधव एकाकी
समर्थक राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल 
माजलगाव (रिपोर्टर):- गेली १५ वर्ष माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार प्रकाश सोळंके यांच्या आशिर्वादेने माजलगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमनपद भूषविणारे दीपक जाधव केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपात गेले असले तरी ते पूर्णतः एकाकी पडले आहेत त्यांच्या जाण्याने कोणताही परिणाम झालेला नसून खरेदी-विक्री संघाचे सर्व संचालक मंडळ प्रकाश सोळंके यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा असल्याचा दावा व्हाईस चेअरमन वहीद पटेल आणि संचालक बालासाहेब भोसले यांनी आज बैठकीत केला. 
  विजयादशमीच्या मुहूर्तावर माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या केसापुरी येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीला खरेदी-विक्री संघाचे सर्व १२ संचालक उपस्थित होते. यावेळी व्हाईस चेअरमन वहीद पटेल संचालक बालासाहेब भोसले, सुभाष आरडे, शंकर आगे, महेश सोळंके, निवृत्ती सोळंके, वैजनाथ बोबडे, अनुसया गोरखनाथ डाके, शारदा बंडू चव्हाण, अनिल लाखे, शहाजी कोलते, प्रकाश नेहरकर आदींनी आपली भूमिका विशद केली. यावेळी बोलताना व्हाईस चेअरमन वहीद पटेल म्हणाले केवळ स्वार्थासाठी भाजपावासी झालेले दीपक जाधव भाजपात एकाकी पडलेले आहेत. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि प्रकाश सोळंके 
यांच्यावर कसलाही परिणाम होणार नसून
 उलट संघटन वाढले आहे. गेली १५ वर्ष प्रकाश सोळंके आशिर्वादाने विविध लाभाची व सन्मानाची पदे घेतली त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून दीपक जाधव यांनी आपल्या विविध पदांचा राजीनामा द्यावा आणि स्वाभिमान दाखवावा असे आव्हान दीपक जाधव यांना सर्व संचालक मंडळाने दिले. 
दीपक जाधव यांना धक्का; समर्थक राष्ट्रवादीत दाखल 
स्वार्थ हेतू डोक्यात ठेवून भाजपात प्रवेश केलेले दीपक जाधव पूर्णतः एकाकी पडल्याचे चित्र दिसत आहे. उलट दीपक जाधव भाजपात गेल्यानंतर छत्रबोरगाव आणि परिसरातील जाधव यांचे समर्थक आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. विजयादशमीच्या मुहूर्तावर माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत छत्रबोरगाव येथील देसाई जाधव, तुळशीदास जाधव, गुलाब जाधव, तुकाराम जाधव, बळीराम जाधव, आश्रुबा जाधव, आण्णा अंबुरे, अरूण जाधव, विठ्ठल जाधव, सुशांत जाधव, प्रभाकर जाधव आदींनी प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश केला. या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे दीपक जाधव यांना मोठा धक्का बसला असून छत्रबोरगाव परिसरात वातावरण राष्ट्रवादीला अनुकूल झाले आहे.
 

अधिक माहिती: beed reporter

Best Reader's Review