ताज्या बातम्या

नालीवर बसून दुर्गंधी हुंगणार्‍यांकडून हिच अपेक्षा शिवलाल मुळुक, सुपेकर, शिंदे, भोसलेंचं पत्रक

नालीवर बसून दुर्गंधी हुंगणार्‍यांकडून हिच अपेक्षा
शिवलाल मुळुक, सुपेकर, शिंदे, भोसलेंचं पत्रक
बीड (रिपोर्टर):- किशोर उबाळेंसह इतरांनी सुरेश नवलेंबाबत ज्या भाषेचा उपयोग केला ती भाषा दलालांना शोभणारी असून किशोर उबाळेंनी १९९५ सालच्या लढतीत तेल गल्लीमध्ये कोणाच्या घरात पैसे मोजून घेण्याचे काम केले ते आधी जाहीर करावे आणि चुंगडे मामांनी तर एकनिष्ठतेवर बोलूच नये, आता आमचा संकल्प संदीप क्षीरसागरांना निवडून आणण्याचा आहे. कोणाबरोबर किती कार्यकर्ते आहेत, हे निवडणुकीनंतरच कळेल, अशा आशयाचे धीर गंभीर प्रसिद्धी पत्रक शिवलाल मुळुक, सुधीर सुपेकर, विठ्ठल शिंदे, पांडुरंग भोसले यांनी प्रसिद्धीस दिले आहे. 
   पत्रकात पुढे म्हटले आहे की, माजी मंत्री सुरेश नवले यांच्याबाबत किशोर उबाळेंसह काहींनी जी भाषा वापरली आहे ती फक्त दलालांनाच शोभू शकते. नवले व क्षीरसागर यांच्यात १९९५ साली लढत झाली तेव्हा किशोर उबाळे यांनी तेल गल्लीमध्ये कोणाच्या घरात पैसे मोजून घेण्याचे काम केले ते उबाळेंनी आधी जाहीर करावे. खायचं एकाचं अन् गायकचं दुसर्‍याचं हेच काम उभ्या आयुष्यात किशोर उबाळेंनी केलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर शिवणीमधलं देता येईल तिथं किशोर उबाळे जयदत्त क्षीरसागरांना मदत करायची आहे असं म्हणताच शिवसैनिकांनी त्यांच्या कशा झिंज्या उपटल्या होत्या तेही त्यांनी आठवावं, आता तर उपटण्यासाठी झिंज्याही राहिल्या नाहीत. नालीवर बसून दुर्गंधी हुंगणार्‍यांकडून आम्हाला 
हीच अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले. चुंगडे मामांविषयी काय बोलावं, अनिल दादांनी पक्षाचा एबी फॉर्मसुद्धा तुमच्या हातात दिला नाही, मामा बनवावं तर चुंगडे मामांनीच. १७ पक्ष फिरून मी निष्ठावंत कसा? हे त्यांनीच सांगावं. संदीप क्षीरसागर हे पवारांचे उमेदवार आहेत, त्यांना निवडून आणण्याचा संकल्प आमचा आहे. 
आता कोणाबरोबर किती कार्यकर्ते आहेत हे निवडणुकीनंतरच कळेल. असे 
पत्रकामध्ये शिवलाल मुळुक, सुधीर सुपेकर, विठ्ठल शिंदे, पांडुरंग भोसले यांनी म्हटले आहे. 

अधिक माहिती: beed reporter

Best Reader's Review