ताज्या बातम्या

बीडचा ऊसतोड कामगार काश्मीरमध्ये सफरचंद तोडायला जाणार का?

नेटकर्‍यांचा अमित शाहाला सवाल
बीडचा ऊसतोड कामगार काश्मीरमध्ये सफरचंद तोडायला जाणार का?
बीड (रिपोर्टर):-भीषण दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकर्‍यांचे प्रश्‍न, हाताला काम नाही म्हणून ऊस तोडायला लाखोंच्या संख्येने जाणारा मजूर, नापिकीमुळे शेतकर्‍यांची आत्महत्यांची वाढती संख्या, वाढती बेरोजगारी यासारखे असंख्य प्रश्न असताना ३७० कलम रद्द करून स्थानिक प्रश्नांना बगल देण्याचे काम भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले. त्यातच बीडच्या नेतृत्वाने मजुरांच्या हातात कोयता दिसणार नाही यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावरून आता सोशल मिडीयावर वादंग उडाले असून बीडचा ऊसतोड कामगार यावर्षी काश्मीरमध्ये सफरचंद तोडायला जाणार का? असा प्रश्न उपस्थित करू लागले आहेत.
   सध्या बीड जिल्हा दुष्काळाचे चटके दुष्काळाचे चटके सहन करत आहे. शेतकरी आत्महत्या इतक्या वाढल्या आहेत की देशात आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या जिल्हा म्हणून नावलौकिक मिळवला जात आहे. अद्याप ऊसतोड कामगारांचा 
जिल्हा म्हणून लागलेला कलंक मिटला नाही. बेरोजगारांचे रोजगारासाठी जत्थेच्या जत्थे मुंबई-पुणे सारख्या शहरांकडे स्थलांतरित होत आहेत. जिल्ह्यात पाणी व चारा चारा टंचाई ने रौद्र रूप धारण केले आहे. असे एक ना अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित 
आहेत. काल किमान आश्वासनांच्या माध्यमातून का होईना जनतेला थोडासा ओलावा मिळेल अशी अपेक्षा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 
यांच्याकडून होती.मात्र सावरगाव येथील भगवान बाबांच्या भक्तांना संबोधित करताना जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम महत्त्वाचे वाटले. यावर त्यांनी भाष्य केले. वंचितांच्या प्रश्नांना  न्याय देण्याचा प्रयत्न करत असल्याच त्यांनी सांगितलं. अमित शहांनी त्यांच्या प्रश्नांना बगल देण्याचे काम मात्र इमानेइतबारे केलं. त्यातच बीडच्या भाजपाच्या मुख्य नेतृत्वाने मात्र मी ऊसतोड कामगारांच्या हातात कोयता दिसणार नाही यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले परंतु अमित शहा निघून गेल्यानंतर सोशल मीडियावर यावर वादंग माजले आहे.ऊसतोड कामगारांच्या हातात कोयता दिसणार नाही तर मग त्यांना सफरचंद तोडायला काश्मीरला घेऊन जाणार का असा प्रश्न उपस्थित केला आहे. दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकर्‍यांच्या उपाशी पोटाला राष्ट्रभक्तीचे डोस पाजून उपयोग असतो काय असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. येणार्‍या काळात तरी ही निवडणूक जनतेच्या जीवन-मरणाच्या प्रश्नावर लढली जाईल अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

अधिक माहिती: beed reporter

Best Reader's Review