ताज्या बातम्या

बीडच्या जनतेनी ठरवलंय, यंदा दुष्ट प्रवृत्तीचा  नायनाट करायचा, कौल संदीप क्षीरसागरांना द्यायचा 

बीडच्या जनतेनी ठरवलंय, यंदा दुष्ट प्रवृत्तीचा 
नायनाट करायचा, कौल संदीप क्षीरसागरांना द्यायचा 
बीड (रिपोर्टर):- ३० वर्षे जनतेच्या भावनांशी खेळणार्‍या जयदत्त क्षीरसागरांचा पराभव करण्याचा जनतेचा निर्धार !
बीड (रिपोर्टर):- विजयादशमी महोत्सव हा दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट केल्यानंतर साजरा केला जातो. अशाच दुष्ट प्रवृत्ती अद्याप बीड तालुक्यात आहेत. या जयदत्त क्षीरसागर रुपी दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट करण्याचा संकल्प यंदा जागरूक मतदारांनी घेतला आहे. आज दसर्‍यानिमित्त गावोगाव अन शहरातील गल्लोगल्ली ३० वर्षे जनतेच्या भावनांशी खेळणार्‍या जयदत्त क्षीरसागरांचा पराभव करायचा असा निर्धार आता खुद्द जनतेनेच केला आहे. जयदत्त क्षीरसागरांनी नाना प्रकारे कित्येक पिढ्यांची नुसत्या आश्वासनावर बोळवण केलेली आहे. यंदा या सर्व अत्याचाराचा बदला जनता जयदत्त क्षीरसागरांना घरी बसवून घेणार आहे. 
    कुठल्याही आमिषाला बळी न पडता, कोणत्याही भूलथापांना भाव न देता जनताजनार्धन त्यांच्या सुखदुःखात साथ देणार्‍या संदीप क्षीरसागरांच्या पाठीशी राहणार असल्याचे दिसत आहे. नौकरी देतो, सूतगिरणीवर घेतो, बचत गटातून शेळ्या मेंढ्या,
 विहिरी आदींचे आश्वासन गेल्या कित्येक वर्षात पूर्ण झाले नाही ते आता कधी होणार आहे. नुसत्या अशासनांवर आपण त्यांच्या जाळ्यात ओढले जातो अन ते आपला मतांवर मंत्रीपदे बळकावून स्वतःची संपत्ती वाढवून घेतात. एक सामान्य नागरिक म्हणून आपल्या कोणत्याही समस्येत उभा राहणारा बीड तालुक्यात एकमेव नेता म्हणजे संदीप क्षीरसागर. मात्र ३० वर्षांच्या सत्तेतील कार्यकाळात जयदत्त क्षीरसागरांनी विकासाच्या नुसत्या पोकळ गप्पा मारण्याचे काम केले आहे. विकासाच्या डांगोरा कितीही पिटला गेला तरी येथील लोक जागरूक आहेत. कित्येक गावांमध्ये प्यायचे पाणी नाही, लाईट गेली तर महिनोंमहिने येत नाही, रस्त्यांचे तर बोलणेच गैर झाले आहे. बीड शहरात लोकांच्या बाहेर पाडण्यावर यांनी बंदी आल्यासारखे अख्खे रस्तेच उखडून टाकण्याचे काम यांनी केले आहे. या जयदत्त क्षीरसागर रुपी दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट करण्याची संधी आली आहे हे जाणून संदीप क्षीरसागरांना कौल देण्याचा निर्धार यंदा जनतेनी घेतला आहे.

अधिक माहिती: beed reporter

Best Reader's Review