ताज्या बातम्या

घटक पक्ष कमळावर स्वार, नेत्यात नाराजीचा सुर 

घटक पक्ष कमळावर स्वार, नेत्यात नाराजीचा सुर 

मजीद शेख
---

भाजपासोबत घटक पक्षाची मोळी गेल्या लोकसभा निवडणुकीत बांधण्यात आली होती. त्यात प्रमुख भुमिका स्व. गोपीनाथराव मुंडे यांची होती. या निवडणुकीत घटक पक्षांना १४ जागा सोडण्यात आल्या, मात्र जागा देतांना घटक पक्षांना कमळाच्या चिन्हावर लढवण्यास सांगण्यात आले. घटक पक्षांचे उमेदवार कमळाच्या चिन्हावर लढत असल्याने घटक पक्षामध्ये नाराजीचा सुर उमटू लागला. आपलं चिन्ह असतांना कमळाच्या चिन्हावर निवडणुका लढवणं म्हणजे आपलं भविष्यात अस्तित्व राहणार की नाही अशी भीती रिपाइं, रासपा यांना वाटू लागली. 
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी राज्यात घटक पक्षांची मोळी बांधली, या मध्ये रिपाइं. स्वाभीमानी पक्ष, रासपा, शिवसंग्राम या पक्षाचा समावेश होता. सत्ता आल्यानंतर घटक पक्षांना वाटा देण्याचा करार झाला होता. दुर्देवाने लोकसभा निवडणुका झाल्यानंतर गोपीनाथराव मुंडे यांचे निधन झाले, त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या, यात राज्यात भाजपाची सत्ता आली. सत्तेत घटक पक्षांना योग्य तो वाटा देण्यात आला नाही. रासपाचे महादेव जाणकार यांना कॅबीनेट मंत्री देण्यात आले, मेटे यांना डावलण्यात आले, आठवले यांना केंद्रात राज्यमंत्रीपद दिले असले तरी राज्यात मात्र सत्तेत वाटा मिळाला नाही, निवडणुकीच्या आधी तीन महिन्यापुर्वी महातेकर यांना मंत्री देवून बोळवण करण्यात आली. शेट्टी तर आधीच भाजपाला सोडून गेले होते. सध्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यात घटक पक्षांना १४ जागा सोडण्यात आल्या. यातील पाच जागा आठवले यांच्या पक्षाला दिल्या. घटक पक्षांना सोडलेल्या जागांवर घटक पक्षांच्या चिन्हा ऐवजी भाजपाच्या चिन्हावर निवडणुका लढवण्याची अट घालण्यात आलेली आहे. त्यामुळे आठवले नाराज आहेत. त्यातच सहा जागाची बोलणी झाली त्यातील एक जागा कमी करण्यात आली. भाजपाने रिपाइंला राजकीय ’फास’ टाकल्याने आठवले यांनी नाराजी बोलून दाखवली. आपण नाराज आहोत पण आता पर्याय नाही असं हाताश वक्तय आठवले यांनी केले आहे. आठवले यांनी दहा जागांची मागणी केली होती. त्यातील फक्त पाच जागा देण्यात आल्या आहेत. सत्ता आल्यानंतर एक कॅबीनेट मंत्री, एक राज्यमंत्री, तीन महामंडळाचे अध्यक्ष, दोन विधान परिषदा देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आठवले यांनी संागितले. आता यातील किती पदरात पडेल हे आगामी काळात दिसेल? दुसरे घटक पक्षाचे नेते  महादेव जाणकर यांना तीन जागा देण्यात आल्या. या जागा ही कमळाच्या चिन्हावर लढवल्या जात असल्याने जाणकर हे चांगलेच संतापले आहेत.  आ. मेटे  आणि सदाभाऊ खोत यांना ही एक दोन जागाशिवाय काहीच मिळालं नाही. एकूण घटक पक्षांची भाजपात वाताहत झाली हे दिसून आलं. घटक पक्षांना स्वत:च्या चिन्हावर निवडणुका लढवण्याचा अधिकार भाजापाने दिला नाही. त्यामुळे घटक पक्षांना आपलं भवितव्य अवघड दिसू लागंल्याने घटक पक्ष संताप व्यक्त करत आहेत, पण रिकामा संताप व्यक्त करुन काय फायदा? 


मेटे बीडमधून 
होते इच्छुक 

घटक पक्षाला बीडची जागा सोडावी म्हणुन मेटे यांनी प्रचंड प्रमाणात ताकद लावली होती, पण ही जागा शिवसेनेला सोडण्यात आली. गेल्या वेळी मेटे यांना बीडमधून चांगली मते पडली होती, त्यामुळे त्यांनी बीडच्या जागेचा आग्रह धरला होता. मात्र त्यांची मागणी पुर्ण होऊ शकली नाही. आपण बीड मधून निवडणुक लढवणारच अशी गर्जना मेटें यांनी केली होती, मात्र त्यांनी आपली तलवार म्यान करत आपण युतीच्या पाठीशी असल्याचे सांगितले, गेल्या पाच वर्षात मेटेंना मंत्रीपद मिळालं नाही. त्यामुळे ते नाराज होते.आता भविष्यात त्यांना काय आश्‍वासन दिले हे मेटे यांनाच माहित? 


केजची जागा 
रिपाइंला दिली नाही 

रिपाईने एकुण राज्यात दहा जागाची मागणी केली होती. त्यामध्ये मराठवाड्यातील केज मतदार संघ रिपाइंला सोडावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि रिपाइंचे युवा प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे यांनी केली होती, मात्र ही जागा भाजपाला सोडण्यात आली.  

अधिक माहिती: beed reporter

Best Reader's Review