कडेकोट बंदोबस्तात सहाही मतदारसंघात मतदानाला सुरुवात

- दुपारी एक वाजेपर्यंत जिल्ह्यात ३२ टक्के मतदान; बीडमध्ये बोगस मतदारांना संदीप सेनेने पकडले

परळीत मुंडे भाऊ-बहिणीचे तर बीडमध्ये काका-पुतण्याचे,

गेवराईत काका-पुतण्या आणि मेव्हण्याचे तर माजलगावात सोळंके-आडसकरांचे आष्टीत आजबे-धोंडेंचे,

केजमध्ये मुंदडा-साठेंचे भवितव्य सायं.सहा वाजता होणार मतदान यंत्रणेत बंद,  धक्कादायक निकालाची चर्चा 

बीड (ठिकठिकाणच्या रिपोर्टरकडून):- २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून जिल्ह्यातल्या २३८ मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. सकाळी पाऊस सुरू असल्याने ९ वाजेपर्यंत मताचा टक्का अवघ्या साडेतीनवर होता. मात्र १० वाजल्यानंतर जिल्ह्यातल्या अपवाद वगळता सर्वच मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. जिल्ह्यातील सहा मतदार संघातील ११५ एवढ्या उमेदवारांसाठी मतदान होत असून आज सायंकाळी सहा वाजता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर, आ. लक्ष्मण पवार, बदामराव पंडित, विजयसिंह पंडित, बाळासाहेब आजबे, भीमराव धोंडे, नमिता मुंदडा, पृथ्वीराज साठे, माजी मंत्री प्रकाश सोळंके, रमेश आडसकर यांच्यासह अन्य उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत जिल्ह्यात सहा मतदारसंघांसाठी अंदाजे ३२ टक्के मतदान झाले होते.  बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढती पहावयास मिळाल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्वच मतदान केेंद्रांवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तर संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवरील बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी पाऊस सुरू असल्याने नऊ वाजेपर्यंत मताचा टक्का केवळ साडेतीनवर होता. मात्र पावसाने उघडीप दिल्यानंतर दहा वाजल्यापासून जिल्ह्यातल्या सर्वच मतदान केेंद्रांवर मतदारांनी मोठमोठ्या रांगा लावल्या होत्या. महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी बाहेर पडला आहे. दुपारी एक वाजेपर्यंत बीड विधानसभा मतदारसंघात ३३.७० गेवराई ३८.२६, आष्टी २२.२५ टक्के, माजलगाव २८.७० टक्के, परळी २९.७४ टक्के, केज २९.६९ टक्के मतदान झाले होते. दुपारी एक वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू होती. काही मतदान केंद्रांवर दोन गटातील कार्यकर्त्यांत शाब्दीक चकमक उडाल्या. मात्र मतदान शांततेत सुरू होते.  

अधिक माहिती: beed

Best Reader's Review