बीड जिल्ह्यात मताचा टक्का वाढला गेवराई, परळीत सर्वाधिक तर अन्य चार मतदारसंघात ६० च्या पुढे मतदान

बीड जिल्ह्यात मताचा टक्का वाढला
गेवराई, परळीत सर्वाधिक तर अन्य चार मतदारसंघात ६० च्या पुढे मतदान
बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघासाठी काल शहरी भागासह ग्रामीण भागातून उर्त्स्फुत प्रतिसाद मिळाला. सर्वात जास्त मताचा टक्का हा गेवराई मतदार संघात ७४.८ टक्क्यावर जावून पोहोचला तर सर्वात कमी मतदान हे केज विधानसभा मतदार संघात ६३.०३ टक्के एवढे झाले. मात्र राज्यातील मतदान पाहता बीड जिल्ह्यात मताचा टक्का बर्‍यापैकी पहावयास मिळाला.
गेवराई विधानसभा मतदार संघात एकूण ३ लाख ५२ हजार १९२ मतदार असून त्यापैकी २ लाख ६० हजार ८०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. गेवराईमध्ये सर्वाधिक ७४.८ टक्के मतदान झाले आहे. ईकडे माजलगावमध्ये ३ लाख ३१ हजार १६० एकूण मतदारांपैकी २ लाख २७ हजार ६५७ मतदारांनी मतदान करून ६८.७५ टक्के मताचा टक्का घेवून गेले आहेत. ईकडे बीडमध्ये एकूण मतदान ३ लाख ३५ हजार १५० असून त्यापैकी २ लाख १९ हजार ५०० मतदारांनी काल मतदान केले. बीडचा मताचा टक्का ६५.४९ दिसून आला. आष्टी विधानसभा मतदार संघात ३ लाख ७० हजार ४५० मतदारांपैकी २ लाख ३९ हजार ७३ मतदारांनी मताचा हक्क बजावून मतदार संघाचा टक्का ६४.५४ वर नेवून ठेवला. केज विधानसभा मतदार संघात ३ लाख ६१ हजार ७०४ एकूण मतदार आहेत. यापैकी २ लाख २७ हजार ९७५ मतदारांनी मतदान करून या मतदार संघच्या मताचा टक्का ६३.३ वर नेवून ठेवला. गेवराई पाठोपाठ परळी मतदार संघात मोठ्या प्रमाणावर मतदान झाले असून याठिकाणी ३ लाख ६ हजार २०४ एकूण मतदारांपैकी २ लाख २३ हजार ३०० मतदारांनी मतदान केले असून परळीत तब्बल ७२.९३ टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यातील सहा मतदार संघामध्ये एकूण २० लाख ५६ हजार ८६० मतदारांपैकी १३ लाख ९८ हजार ३९६ मतदारांनी मताचा हक्क बजावला आहे. जिल्ह्याची मताची टक्केवारी ६७.९९ वर जावून पोहोचली. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review