मतमोजणी केंद्रावर मोबाईल जॅमर बसवणार नाही -निवडणूक आयोग

मतमोजणी केंद्रावर मोबाईल जॅमर बसवणार नाही -निवडणूक आयोग
बीड/मुंबई (रिपोर्टर):- ईव्हीएम मशीनशी छेडछाड होत असल्याच्या संशयावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादी कॉंग्रेसने मतमोजणी केंद्रावर मोबाईल जॅमर बसवा, अशी मागणी केली होती, परंतु निवडणूक आयोगाने मतमोजणी केेंद्रावर मोबाईल जॅमर बसवणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. 
   विधानसभा निवडणूक घोषीत होण्यापूर्वी ईव्हीएम मशीनबाबत राज्यात संशयकल्लोळ निर्माण झाला होता. अनेक पक्षांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली होती. निवडणूक विभागाने विधानसभेच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीनचाच वापर केला. तत्पूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने मतमोजणी केंद्रावर मोबाईल जॅमर बसवा, अशी मागणी केली होती. निवडणूक आयोगाने या मागणीकडे दुर्लक्ष करत मोबाईल जॅमर बसवणार नसल्याचे स्पष्ट केले. ईव्हीएम मशीन या फुलप्रुफ आहेत, तसेच या मशीनना बाह्य यंत्राद्वारे हाताळता येऊ शकत नाही त्यामुळे मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंगरुममध्ये मोबाईल जॅमर बसवण्याचा प्रश्‍नच उद्भवत नसल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी स्पष्ट केले. आम्ही व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनबाबत सर्वठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम राबविले आहेत. तसेच त्याचा इंटरनेटशी, वायफायशी कोणत्याही प्रकारे संपर्क होऊ शकत नाही त्यामुळे अशा परिस्थितीत जॅमर लावण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे सिंग यांनी स्पष्ट केले.  

अधिक माहिती: beed

Best Reader's Review