ताज्या बातम्या

आष्टीत ‘कटप्पाने बाहुबली को क्यो मारा?’

वृत्तपत्रांमधील जाहिरातीने चर्चेला उधान

बीड (रिपोर्टर):- आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार भीमराव धोंडे यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांनी दारूण पराभव केल्यानंतर आष्टीतला पराभव हा अंतर्गत गटबाजीतून झाल्याची चर्चा होत असतानाच आज स्थानिक दैनिकात पाठीत तलवार खुपसलेला बाहुबली चित्रपटातील छायाचित्र असलेली जाहिरात छापून आष्टीत कटप्पाने बाहुबली को क्योंं मारा, असा अप्रत्यक्ष सवाल विचारला गेला आहे. त्यामुळे या जाहिरातीने चर्चेला उधान आले आहे. 
   भीमराव धोंडे यांना उमेदवारी देण्यात येऊ नये म्हणून जुन्या भाजपाच्या कार्यकर्त्यांसह नव्याने भाजपात डेरेदाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला होता. आ. सुरेश धस यांच्या पुत्रानेही उमेदवारी दाखल केली होती. उमेदवारी अर्ज काढून घेण्याच्या शेवटच्या दिवशी सुरेश धसांनी कार्यकर्त्यांना शांत करत उमेदवारी अर्ज परत घेतला होता आणि कार्यकर्त्यांना पक्षादेश पाळण्याच्या सूचना दिल्या होत्या, परंतु त्यानंतर भाजपाच्या नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचे आणि भीमराव धोंडेंचे मनोमिलन तर सोडा साधी बातचीतही होत नव्हती. धोंडेंकडून अविश्‍वास दाखवला जात असल्याचा आरोप केला जात होता. यामध्ये प्रचाराचे दिवस निघून गेले, ऐनवेळेस उमेदवारी मिळालेले राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब आजबे निकाला दिवशी अचानक आघाडी घेत राहिले आणि तेथूनच भीमराव धोंडेंचा पराभव आदल्या दिवशीच चर्चीला जाऊ लागला. निकाल लागला आणि आजबे बहुमताने विजयी झाले. निकालाच्या दोन दिवसानंतर आज स्थानिक वर्तनमानपत्रात बाहुबली चित्रपटातील कटप्पा आणि बाहुबली यांच्यातला बाहुबलीच्या पाठीत खुपसलेली तलवार असलेला फोटो जाहिरातीत वापरून त्या जाहीरातीला आष्टी विधानसभा मतदारसंघ असे शिर्षक देण्यात आले. या जाहिरातीने ‘आष्टीत कटप्पाने बाहुबली को क्यो मारा?’ असा सवाल विचारण्यात आल्याने आष्टी मतदारसंघ चर्चेत आला आहे. 

अधिक माहिती: beed reporter

Best Reader's Review