ताज्या बातम्या

बीडमध्ये एका बालकास डेंग्यूची लागण

बीडमध्ये एका बालकास डेंग्यूची लागण
बीड (रिपोर्टर) :- नगर पालिकेच्या स्वच्छतेबातत हलगर्जीपणा होत असल्याने विविध रोगाला आमंत्रन मिळू लागलेे. शहरातील भालदारपुरा येथील एका १० वर्षीय बालकास डेंग्यूची लागण झाल्याने त्यास खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सय्यद अर्शद (वय १० वर्षे) यास ताप येत असल्याने त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तपासणी अंती त्यास डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले आहे. बीड शहरामधये नगर पालिकेकडून वेळेवर स्वच्छता केली जात नसल्याने शहरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून यातून डेंग्यू सारख्या भयानक आजाराला बीडकरांना सामोरे जावे लागत आहे. अनेक नागरिकांना विविध आजाराने घेरले असून त्यामध्ये तापीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात रुग्णालयात उपचार घेत असल्याचे दिसून येत आहे.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review