विष घेतलेल्या कर्जबाजरी शेतकर्‍याचा मृत्यृ

eReporter Web Team

विष घेतलेल्या कर्जबाजरी शेतकर्‍याचा मृत्यृ
बीड (रिपोर्टर) :- सोसायटीचे कर्ज,  पाच वर्षानंतर अतिवृष्ठीने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतलेल्या कर्जबाजरी शेतकर्‍याने विष पिवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. त्याच्या शेतकर्‍यावर जिल्हारुग्णालयात उपचार सुरु असता आज सकाळी मृत्यू झाला.
अरुण मारोती शिंदे (वय ३० वर्षे रा. कुक्कडगाव, ता बीड) या कर्जबाजारी शेतकर्‍याने दि. २६ ऑक्टोंबर रोजी विष पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्या शेतकर्‍याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्या आज त्या शेतकर्‍याने अखेरचा श्‍वास घेतला. या प्रकरणी मयताचे वडील मारुती सीताराम शिंदे यांच्या खबरीवरुन पोलिस चौकीमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या पश्‍चात आई-वडिल, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like