ताज्या बातम्या

जिल्हा रुग्णालयाच्या चौकीत नियुक्ती करुनही कर्मचारी हजर नाहीत; सुरक्षा पुन्हा वार्‍यावर

जिल्हा रुग्णालयाच्या चौकीत नियुक्ती करुनही कर्मचारी हजर नाहीत

सुरक्षा पुन्हा वार्‍यावर
बीड (रिपोर्टर) :- जिल्हारुग्णालयात नातेवाईक-कर्मचारी यांचा वादा रोजच वाढत असून यातच भुरटे चोरटे रुग्णांसह नातेवाईकांचे पैसे, सोने लंपास करतात. यासह छेडछाडीच्या घटनाही होत आहेत. त्यामुळे जिल्हारुग्णालयामध्ये पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी कायमस्वरुपी दोन शस्त्रधारी कर्मचार्‍यांसह दोन महिला पोलिस कर्मचार्‍यांची नियुक्ती  तीन दिवसांपूर्वीच केली होती.  अद्याप ते कर्मचारी हजर झाले नसल्याने पुन्हा जिल्हारुग्णालयाची सुरक्षा वार्‍यावर आली आहे.
जिल्हारुग्णालयात रोजच घडत असलेल्या गोंधळामुळे पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी तेथे कार्यरत असलेल्या दोन कर्मचार्‍यांची बदली करुन त्यांच्या जागी शहर पोलिस ठाण्यातील एएसआय एस.डी. शेख व  पो.ह. वंजारे यांच्यासह दोन महिला पोलिस कर्मचारी आणि दोन शस्त्रधारी कर्मचार्‍यांची नियुक्ती केली होती. यातील केवळ एएसआय एस.डी. शेख व  पो.ह. वंजारे  हे हजर झाले आहेत. मात्र दोन महिला कर्मचारी अणि दोन शस्त्रधारी पोलिस अद्यापही हजर झाले नसल्याने पुन्हा जिल्हारुग्णालयाची सुरक्षा वार्‍यावर आली आहे. त्यामुळे त्या कर्मचार्‍यांना तत्काळ रुजू होण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी होत आहे.

अधिक माहिती: district hostpital beed

Best Reader's Review