ताज्या बातम्या

महाशिवआघाडी दोन दिवसात निर्णय घेणार

महाशिवआघाडी दोन दिवसात निर्णय घेणार
राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे विधानसभा भंग होणे नाही
घटनात्मक पेचात अडकलेल्या महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबाबत अद्याप एकही पक्ष सत्ता स्थापन करू शकला नाही. अशा स्थितीत राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात येते. मात्र राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे विधानसभा भंग होणे असे नाही. त्यामुळे आज जरी राज्यपालांनी राष्ट्रवादीला बोलावले असले आणि राष्ट्रवादी  सत्ता स्थापन करू शकली नाही तरी राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही पक्षांना सत्ता स्थापन करता येते. त्यामुळेच महाशिवआघाडी याबाबत दोन दिवसात योग्य तो निर्णय घेणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. शिवसेनेचाच मुख्यमंत्री गृहीत धरून या दोन दिवसात किमान समान चर्चा केली जाणार आहे आणि त्यानंतर सत्ता स्थापनेची प्रक्रिया होईल असे महाशिवआघाडीच्या एका महत्त्वाच्या नेत्याने सांगितले आहे. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review