ताज्या बातम्या

गंगाधर घुमरे यांना पितृशोक उद्या वलीपूर येथे अंत्यसंस्कार

गंगाधर घुमरे यांना पितृशोक
उद्या वलीपूर येथे अंत्यसंस्कार
बीड-जि.प.चे माजी उपाध्यक्ष तथा जि.प.सदस्य गंगाधर घुमरे यांचे वडील श्रीमंतराव दौलतराव घुमरे यांचे आज दुपारी वृद्धपकाळाने दु:खद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय १०७ वर्षे एवढे होते. श्रीमंतराव घुमरे हे स्व.केशरकाकू यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जायचे. मनमिळाऊ स्वभाव, मितभाषिक आणि सर्वांना मदत करण्याची भूमिका ठेवणारे श्रीमंतराव मनानेही तेवढेच श्रीमंत होते. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या राहत्या गावी वलीपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
बीड तालुक्यातील वलीपूर येथील श्रीमंतराव दौलतराव घुमरे हे मोठे प्रस्थ स्व.केशरकाकू यांच्या राजकीय कार्यकाळात त्यांचे खंदे समर्थक म्हणून श्रीमंतराव यांच्याकडे पाहितलं जातं. राजकारण, समाजकारण, व्यापार, व्यवसाय, धोरण यामध्ये हातोटी असलेले मनमिळाऊ स्वभावाचे श्रीमंतराव वयाच्या १०७ वर्षे ठिकठाक होते. गेल्या काही दिवसापासून वृद्धपकाळाने ते अस्वस्थ असल्याने घरीच असायचे. आज दुपारी श्रीमंतराव यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या वलीपूर येथे सकाळी साडेनऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते जि.प.चे माजी उपाध्यक्ष तथा जि.प.सदस्य गंगाधर घुमरे यांचे वडील आहेत. त्यांच्या पश्‍चात चार मुलं, दोन मुली, सुना, नातवंड असा मोठा परिवार आहे. घुमरे परिवाराच्या दु:खात सायं.दै.बीड रिपोर्टर परिवार सहभागी आहे.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review