ताज्या बातम्या

परळीमध्ये युवतीची गळफास घेवून आत्महत्या

परळी (रिपोर्टर):- बसवेश्वर कॉलनी भागात राहणार्‍या एका २१ वर्षीय युवतीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला कळवण्यात आल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला.
सबीया बेगम सय्यद महेबुब या युवतीने आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार घरच्या लोकांना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती परळी पोलीसांना कळवली. पोलीसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. या युवतीने कुठल्या कारणावरून आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. 

अधिक माहिती: beed reporter

Best Reader's Review