ताज्या बातम्या

विद्युत तार घरावर पडल्याने एकाचा मृत्यू

विद्युत तार घरावर पडल्याने एकाचा मृत्यू
चिंचाळा येथे काल घडली घटना
वडवणी (रिपोर्टर):- घरावरील गच्चीवर सायंकाळी  कुंटुब समावेत बसले आसता याठिकाणी महावितरणाची  विद्युत तार कोसळल्याने  एकाला आपले प्राण गमवावे लागले आहे ही घटना रविवारी सायंकाळी सहा वाजता वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे घडली आहे.
    सखाराम तुकाराम वाळेकर वय वर्षे ५० असे मयताचे असे नाव आहे. ते पत्नी दोन, मुले, सुना, नातवंडे सह राहतात रविवारी सायंकाळी कुटुंबासमावेत ते घराच्या गच्चीवर बसले होते यावेळी अचानक विद्युत तार तुटून अंगावर पडली यात कुंटुब बचावले परंतु सखाराम वाडेकर हे जखमी झाले आरडाओरडा झाल्यानंतर शेजार्‍यांनी काठीने तार हटवली व नंतर विद्युत प्रवाह बंद करून त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवले मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. दरम्यान या दुर्घटनेतून वाळेकर कुटुंब बालबाल बचावले आहे. मात्र यात  कुटुंबप्रमुखाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

अधिक माहिती: beed police

Best Reader's Review