ताज्या बातम्या

डॉ.प्रियंका रेड्डी अत्याचार प्रकरणी बीडमध्ये विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा

डॉ.प्रियंका रेड्डी अत्याचार प्रकरणी बीडमध्ये विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा
बलात्कार्‍यांना कडक शासन करण्यासाठी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर
बीड (रिपोर्टर) :- एका डॉ. तरुणीवर चार नराधमांनी सामुहिक अत्याचार करुन तीला जिवंत जाळल्याची संतापजनक घटना हैद्राबाद येथे घडल्याने देशभर संतापाची लाट उसळली आहे. बीडमध्ये विद्यार्थ्यांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि चारही नराधमांना तत्काळ फाशी द्यावी या मागणीसाठी महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.
हैद्राबाद-बैंगलोर महामार्गावर अमानवी कृत्य करून डॉ.प्रियंका रेड्डी यांचा जाळून खून केल्याची संतापजनक घटना २८ नोव्हेंबर रोजी घडली. या घटनेचा देशभरातून तिव्र निषेध नोंदवला जात आहे. बीड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज बीड शहरातून मुकमोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हैद्राबाद येथील डॉ.प्रियंका रेड्डी यांच्यावर चार जणांनी सामुहिक बलात्कार करून त्यांचा जाळून खून केला आहे. या अमानवी घटनेचा आम्ही तिव्र निषेध करत असून त्या चारही आरोपींना कडक शासन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. हा मुक मोर्चा सकाळी ११ वाजता बीड शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुभाष रोड मार्गे बसस्टॅण्ड, छत्रपती शिवाजी महारात पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निघाला. यावेळी विद्यार्थी सुजाता मोराळे, रूचा सिरसट, प्रियंका गोदाम, प्राची सिरसट, ॠतुजा धारूरकर, मोहन जाधव, पल्लवी ढाकणे, प्रियंका भोसले, मंगल जाधव, उर्मिला गालफाडे, ज्योती सपकाळ, रविना सवाई, चित्रा पाटील, मंगल कानडे, महानंदा चव्हाण,सुहास जायभाये, लहू खारगे, दत्ता प्रभाळे, विठ्ठल शेळके, संतोष आरबडे, संदीप कदम यांच्यास आदींची उपस्थिती होती.प्रत्येक जिल्हा स्तरावर विशाखा समिती पुन्हा पुनगर्ठीत करून त्या कार्यान्वित कराव्यात, विशाखा कमिटीच्या बैठका नियमित घेऊन त्याचा अहवाल मागवावा, प्रत्येक विद्यालय आणि महाविद्यालयात विशाखा समिती स्थापन करावी, महिला-मुलींवरील अत्याचाराच्या केसेस जलदगतीत न्यायालयात चालवाव्यात, शहरातून आणि महामार्गावरील पोलिसांची रात्रीची गस्त वाढवावी, पीडित मुलगी, महिला यांना मानसिक धक्क्यातून सावरण्याकरिता मोफत आरोग्य आणि शिक्षणाची व्यवस्था करावी. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review