पंकजा मुंडे सेनेच्या संपर्कात संजय राऊतांचा दावा  पंकजांच्या ट्विटर हँडलवरून भाजपचं नाव गायब 

eReporter Web Team

पंकजा मुंडे सेनेच्या संपर्कात संजय राऊतांचा दावा 
पंकजांच्या ट्विटर हँडलवरून भाजपचं नाव गायब 
बीड (रिपोर्टर):- घर फिरले की घराचे वासे फिरतात तशी स्थिती राज्यातील भाजपाची झाल्याचे दिसून येत असून पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे सातत्याने स्वपक्षीयांवर टीका करत असतानाच आता राज्याच्या माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनी काल फेसबुक पोस्ट टाकून भाजपात अस्वस्थता निर्माण केलेली असतानाच आज पुन्हा पंकजा मुंडेंनी आपल्या ट्विटर हँडलवरून भाजपाचे नाव काढून टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे पंकजा शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होत असतानाच दुसरीकडे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील आजच्या अग्रलेखात भाजपाने बहुजन समाजाचा चेहरा गमावला आहे, असं म्हणत १७० चा आकडा १८५ पर्यंत पोहचला तर त्यात अश्‍चर्य वाटायला नको. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर जे घडले आहे व घडू पाहत आहे तो सर्व प्रकार म्हणजे भाजपाचे कर्मफळ आहेत. असं म्हटलं आहे त्यामुळे पंकजा मुंडेंच्या हालचाली अन् शिवसेना मुखपत्रातील भूमिका पंकजा मुंडेंच्या भाजप सोडण्याला बळ देत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही आज प्रसिद्धी माध्यमासमोर पंकजा मुंडे मुंडेंसह भाजपातले अनेक आमदार शिवसेनेशी संपर्कात असल्याचा दावा केल्याने भाजपात खळबळ उडाली आहे. 
     राज्याच्या माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी काल फेसबुकवर एक भावनिक पोस्ट केली. ‘पुढे काय करायचे?, कोणत्या मार्गाने जायचे? आपली शक्ती काय? यावर चर्चा करण्यासाठी समर्थकांना साद घातली. १२ डिसेंबरला स्व. गोपीनाथराव मुंडे यांची जयंती असून या जयंतीदिनी पंकजा मुंडे खुल्या मनाने समर्थकांसोबत चर्चा करणार आहेत आणि याच दिवशी पुढील दिशा ठरवणार असल्याचे पंकजा मुंडेंनी सांगितलं होतं. या पोस्टने राज्य भाजपात अस्वस्थता निर्माण करून सोडली, पाठोपाठ आज पंकजा मुंडेंनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून भाजपाचे नाव काढून टाकले आहे. ट्विटर हँडलवरचा आपला बायो बदलला असून २८ नोव्हेंबरला पंकजा यांनी शेवटचे ट्विट केलेले आहे. त्या दिवशीच्या दिवसभरात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे कौतुक करणारे ट्विट त्यांच्या ट्विट हँडलवर दिसून येते. त्यामुळे पंकजा मुंडेंनी त्या दिवशी केलेल्या ट्विटमुळे अनेक तर्कवितर्क काढले जात असतानाच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाच्या अग्रलेखात भाजपाचे लोक संपर्कात असल्याचे संकेत देणारा पॅराग्राफ पहावयास मिळतो. या अग्रलेखामध्ये भाजपाने बहुजन समाजाचा चेहरा गमावला आहे व जनता त्यांच्यापासून दूर गेली आहे. आज विरोधी पक्ष म्हणून जो आकडा त्यांच्या भोवती दिसत आहे, तो टिकवणे यापुढे अवघड जाईल असे वातावरण आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदानाने पार पाडली असती तर आम्ही जे सांगतो त्यावर मोहोर उठली असती. १७० चे बहुमत साधे नाही व उद्या हा आकडा १८५ पर्यंत पोहोचला तरी आश्चर्य वाटायला नको. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर जे घडले आहे व घडू पाहत आहे तो सर्व प्रकार म्हणजे भाजपाचे ‘कर्मफळ’ आहे. हे सर्व संदर्भ पाहता आणि आज अचानक शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंकजा मुंडेंसह भाजपातले अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा केल्याने भाजपात प्रचंड खळबळ उडाली आहे. 


अधिक माहिती: beed

Related Posts you may like