ताज्या बातम्या

जिल्हा रुग्णालयात सहा महिन्यात ७३ कुपोषित बालकांवर केले उपचार 

जिल्हा रुग्णालयात सहा महिन्यात ७३ कुपोषित बालकांवर केले उपचार 
मातांनाही मिळतो शासकीय भत्ता 
बीड (रिपोर्टर):- भावी पिढी सशक्त आणि सदृढ करण्याच्या दृष्टीकोनातून ० ते ६ वयोगटातील बालकांना अंगणवाडी मार्फत सकस आहार पुरविला जात असला तरी अनेक मुले कुपोषित आढळून येतात. अशा कुपोषित बालकांसाठी जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्र. ९ मध्ये उपचार केले जातात. गेल्या सहा महिन्यात ७३ बालकांवर उपचार करण्यात आले. विशेष करून बालकांच्या मातांना दररोज शंभर रुपये भत्ता दिला जातो. 
शहरी भागासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी अंगणवाड्या सुरू करण्यात आल्यात आहेत. या अंगणवाडीमार्फत ० ते ६ वयोगटातील बालकांना व गर्भवती स्तनदा मातांना आहाराचा पुरवठा केला जातो. असे असताना अनेक बालके कुपोषित आढळून येतात. कुपोषित बालकांवर सरकारी दवाखान्यात उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली. जिल्हा रुग्णालयात कुपोषित बालकांसाठी स्पेशल वार्डची निर्मिती करून त्याठिकाणी एका डॉक्टरासह काही परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यात ७३ बालकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सध्या या वार्डात तीन कुपोषित बालके आहेत. त्या कुपोषित बालकांवर डॉ. पवार मॅडम उपचार करतात. या वार्डातील परिचारीका वाय.एन. गायकवाड, वाय.डी. मुंडे या बालकांच्या उपचारासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. डायट विभागाच्या प्रमुख सावित्री कचरे बालकांसाठी आहाराचे नियोजन करतात. कुपोषित मातांना शासनाकडून दररोज शंभर रुपयांचा भत्ताही दिला जात आहे. कुपोषणाचा नायनाट करण्यासाठी शासकीय स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review