बीड जिल्ह्यातील आठ शहरे रॉकेल मुक्त

eReporter Web Team

बीड जिल्ह्यातील आठ शहरे रॉकेल मुक्त
बीड (रिपोर्टर)ः- राशनवर गेल्या अनेक वर्षापासून कार्डधारकांना रॉकेलचे वाटप केले जाते. मात्र यात भ्रष्टाचाराचा शिकराव झाल्याने रॉकेल सर्रास काळ्या बाजारात विकले जाते. खर्‍या लाभार्थ्यांना रॉकेल मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत असे. पुरवठा विभागाने शहरे रॉकेल मुक्त करण्याचा निर्णय घेतला. विविध योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना गॅस देण्याची मोहीम सुरू करण्यात आली. गेल्या पाच वर्षामध्ये जिल्ह्यातील हजारो सर्वसामान्य नागरीकांना उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून कनेक्शन देण्यात आले. त्यामुळे रॉकेलचा कोठा आपोआपच कमी होत गेला. जिल्ह्यातील बीड, गेवराई, अंबाजोगाई, माजलगांव, पाटोदा, शिरुर, वडवणी, धारुर ही आठ शहरे रॉकेलमुक्त झाले आहे. इतर शहरेही रॉकेलमुक्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पुर्वी रॉकेल हे जिवनाश्यक वस्तूमध्ये मोडत होते. शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये रॉकेलची मागणी मोठ्या प्रमाणात होत असे त्यासाठी शासनाने राशन दुकानावर रॉकेलचा पुरवठा करणे सुरू केेले. मात्र राशन दुकानदार सर्वसामान्य नागरीकंाना रॉकेल न देता त्याचा काळा बाजार करु लागले. वाहनामध्ये राशनच्या रॉकेलचा वापर होवू लागला. राशनवरील रॉकेलचा कोठा कमी करण्यासाठी पुरवठा विभाग गेल्या काही वर्षापासून प्रयत्न करत आहे. शहरी भागातल्या सधन व्यक्तीकडे गॅस कनेक्शन होते. त्यामुळे त्यांना रॉकेलची गरज भासत नव्हती. जे आर्थीक दुष्ट्या पिचलेले आहे. त्यांना गॅस कनेक्शन मिळावे यासाठी शासनाने विविध योजना सुरू करुन त्या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना कनेक्शन दिले जात आहे. केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षात उज्वला गॅस योजनेअंतर्गत गोरगरीबांना गॅस उपलब्ध करुन दिले. त्यामुळे रॉकेलचा कोठा आपोआपच कमी झाला. जिल्ह्यातील बीड, गेवराई, अंबाजोगाई, माजलगांव, पाटोदा, शिरुर, वडवणी धारुर ही आठ शहरे रॉकेलमुक्त झाली आहे. उर्वरीत शहरे ही रॉकेल मुक्त करण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे. ग्रामीण भागातही हजारो नागरीकांकडे गॅस कनेक्नश असल्याने ग्रामीण भागातला रॉकेलचा कोठा कमी होत असल्याचे दिसून येत आहे. 


अधिक माहिती: beed

Related Posts you may like